Viral Fact Check : Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : सरकार देणार मोफत स्मार्ट फोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Viral Fact Check : तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे...होय, सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची मोफत मोबाईलची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

Sandeep Chavan

मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय...तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून, मोबाईल सरकार कुणाला देणार आहे...? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, डिजीटल सेवा योजना केंद्र सरकारने सुरू केलीय.या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे' .

हा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय. काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय...मात्र, खरंच ही योजना आहे का? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का? असे प्रश्न उपस्थित झाल्याने आमच्या टीमने याची पडताळणी केली...याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने सरकारकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य काय?

केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा

केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही

डिजीटल सेवा योजना राजस्थान सरकारची

राजस्थान सरकारने महिलांना फोन वाटले होते

केंद्राची अशी कोणती योजना नाही...लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातायत...मोबाईल अनेक जण वापरत असल्याने असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं...कारण, मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय...त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते...मात्र, आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT