Shocking Jugad Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : धुक्यातून वाट काढण्यासाठी ट्रक चालकाचा जीवघेणा जुगाड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

Shocking Jugad Viral Video:धुक्याचा परिणाम रेल्वे, हवाई, आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मात्र धुक्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रक चालकाने एक जीवघेणा प्रयोग केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Truck Driver Viral Video

उत्तर भारतात मागील काही दिवसात थंडीची लाट पसरली आहे. या थंडीमुळे संपूर्ण परिसरात धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे. या धुक्याचा परिणाम रेल्वे, हवाई, आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मात्र धुक्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रक चालकाने एक जीवघेणा प्रयोग केला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थंडीच्या दिवसात पडणाऱ्या धुक्यामुळे महामार्गावर अनेक विचित्र अन् भयंकर असे अपघात होत असतात. व्हायरल व्हिडिओतून तसेच बातम्यामधून आपल्याला या अपघांताचे फुटेज पाहायला मिळतात. परंतू सोशल मिडियावर धुक्यातून वाट काढण्यासाठी ट्रक चालकाने केलेला थरारक जुगाडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नक्कीच काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका हायवेवरील आहे. या महामार्गावर असंख्य वाहनांची ये-जा दिसत आहे. अशातच रस्त्यावरुन जाणाऱ्या गाडीतील प्रवाशाने ट्रक चालकाचा धक्कादायक प्रकार मोबाईमध्ये कैद केला आहे. व्हायरल व्हिडिओत आपल्याला दिसते की, वेळ सकाळची आहे. सकाळची वेळ असल्याने संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरलेली आहे. दरम्यान वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावर एक ट्रक धावत असतो. परंतू जाणाऱ्या या ट्रकच्या पुढच्या भागावर एक व्यक्ती उभा आहे. व्यक्तीने पाढंऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. व्यक्तीचा जर तोल गेला तर भयानक अपघातही होऊ शकतो याची याला जरही कल्पना नाही.

सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नक्की व्हिडिओ कोणत्या हायवेवरील आहे हे समजू शकले नाही. याआधीही निष्काळजीपणात अनेक भयंकर अपघात झालेले सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ट्रक चालकावर आणि ट्रकच्या बाहेर उभ्या राहिलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी नेटकऱ्याकडून मगणी करण्यात येतेय.व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे की,'आम्ही व्हिडिओ अनेक वेळा बघितला पण आम्हाला धुके कुठे दिसून आले नाही'तर आणखी एक यूजरने लिहिले आहे की,'कधी पडून जीव जाईल सांगता येत नाही'. अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळात असून हजारोंच्या घराच व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT