VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO: न्यूयॉर्कमध्ये मोठी दुर्घटना, ब्रुकलिन ब्रीजला नौदलाचं जहाज धडकलं; 19 जण जखमी

Brooklyn Bridge tragedy: सोशल मीडियावर सध्या सर्वत्र एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. व्हायरल होत असलेली ही घटना न्यू यॉर्क शहरातील आहे. जिथे असलेल्या ब्रुकलिन ब्रिजचा या सर्वांशी संबंध आहे.

Tanvi Pol

New York City: अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात एक मोठी समुद्री दुर्घटना घडली आहे. मेक्सिकन नौदलाचं हे एक जहाज आहे ते थेट ब्रुकलिन ब्रिजला जाऊन धडकलं. या भीषण अपघातात 19 जण जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने न्यू यॉर्कच्या समुद्रकिनारी खळबळ उडाली असून बचाव कार्य वेगानं सुरू आहे.

या जहाजाचं नाव 'Cuauhtémoc' असून ते मेक्सिकन नौदलाचं प्रशिक्षण जहाज आहे. अपघाताचं(Accident) नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार, नौका नियंत्रणावरून सुटल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रकरणी स्थानिक पोर्ट अथॉरिटी व नौदल अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून सध्या सर्व अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरलही होत आहे. सध्या तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे घडलेला भयंकर अपघात दिसत आहे.

थराराक घटना कॅमेऱ्यात कैद

या घटनेचा व्हिडिओ(Video) सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, या जहाची उंची आणि रुंदी अतिशय मोठी आहे. हे जहाज ब्रिजच्या जवळ येत असताना परिसरातील नागरिकांचे लक्ष तिथे जाते. प्रत्येकजण मोबाईल कॅमेऱ्यात होणारी घटना कैद करण्यासाठी उभा असतो. तेवढ्याच हे जहाच ब्रिजला जाऊन आदळते आणि जहाजावरील सर्व उद्धस्त होते.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT