मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की दोन बंधु एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. सध्या बाळसाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विजयी मेळावा होणार आहे, असे मला सांगण्यात आले होते. मात्र, मराठीबद्दल एकही शब्द न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये घ्या, अशी ओरड दिसली. हा मराठी विजयोत्सव नव्हता. ही रुदाली होती. त्या रुदालीचे दर्शन झाले. असेही फडणवीस हसत हसत म्हणाले. यावरच संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
पब्लिक सब जानती है, इसलिये पब्लिक कल आई ये पब्लिक सब जानते आप कितने झूठे लोग है! कल लाखों की संख्या मे पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गये आप भोकला गये हो आप डर गये हो दो ठाकरे ब्रदर से
आता रुदाली, रडणं जाहीरपणे हे तुमचं सुरू झाले आहे. तुमच्यासाठी आम्ही रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे लावतो. फडणवीस गातील कधी शिंदे तबला वाजवतील, शिंदे गातील, कधी हे तबला वाजतील आणि तुंतुनावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेत. तुम्ही कार्यक्रम सुरू करा जागोजागी रडण्याचा असा खोचक पलटवार संजय राऊत यांनी फडणविसांवर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.