Ocean Landing Video: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या परतीचा तो क्षण विशेष खास ठरला, कारण समुद्रात त्यांच्या स्वागतासाठी आश्चर्यकारकरीत्या डॉल्फिन्स उपस्थित असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सध्या समुद्रातील खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अंतराळवीर सुनीता(Sunita) विल्यम्स आणि बूच व्हिल्मोर याचे यान १९ मार्च रोज पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी फ्लोरडा येथे लँड झाले. सुनीता विल्यम्स यांच्या सोबत अजून दोन सहकार्याही परतले आहेत. प्लोरिडामध्ये त्यांचे यान लॅंड झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मूळ गावीही जल्लोष साजरा करण्यात आला आहे शिवाय सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर आल्यानंतर नासाने एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तोही तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी ५ जून २०२४ रोजी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले होते. मोहीम केवळ ८ दिवसांची असण्याची अपेक्षा होती. परंतू, प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्यांच्या पृथ्वीवरील परतीचा प्रवास लांबणीवर पडला होता.
सध्या हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांच्या पसंतीस आलेला आहे. ऐवढेच नाही तर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर प्रत्येकजण भावूकही झालेला आहे. त्यातील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजणांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. हा व्हिडिओ एक्सच्या ''@nabilajamal_''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.