Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: काय चाललंय हे! दिल्ली मेट्रोत पुरुष आणि महिलांमध्ये जोरदार राडा

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील अनेक घटना व्हायरल होत असतात. त्यातच पुन्हा एकदा मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते पाहा.

Tanvi Pol

Fighting Viral Video: दिल्ली मेट्रोमधून दररोज हजारो लोक प्रवास करत असतात आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये विविध प्रकारच्या घडामोडीही घडत असतात. अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेक वेळा सीटवर बसण्यासाठी वाद होतात. सध्या दिल्ली मेट्रोमध्ये असाच एक तुफान वाद समोर आलाय. ज्यात फक्त महिलांमध्ये नाही तर चक्क महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये जागेवरुन वाद झाला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. या मेट्रोमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांनी गजबलेल्या मेट्रोमध्ये एक महिला प्रवासी आणि पुरुषामध्ये वाद सुरु होतो. मेट्रोतील हा वाद इतका टोकाला जातो की, संपूर्ण मेट्रोतील प्रवासी या वादाचा भाग होतात. सुरु झालेला हा वाद सीटच्या कारणावरुन होतो. व्हिडिओच्या शेवटी पाहिले तर एक व्यक्ती सीटवरुन उठतो मात्र, महिलेशी वाद सुरुच ठेवतो. काही प्रवासी महिलेला शांत करत आहे तर काही प्रवासी त्या व्यक्तीला शांत करताना दिसत आहेत.

व्हिडिओ तुफान व्हायरल

हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असून @gharkekalesh या एक्स अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर मेट्रोतील या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स दिले आहेत तर लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत शिवाय त्यावर नेटकरी वर्गातून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हे नेहमीच आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्की कोणाची चुकी ते समजले नाही'' या घटनेत अनेकांनी महिलेची बाजू घेतली आहे तर काहींनी पुरुषांची बाजू घेतलेली आहे.

सोशल मीडियावर याआधी दिल्ली मेट्रोतील अनेक घटना व्हायरल (Viral) झालेल्या आहेत. कधी महिलांमध्ये हाणामारी तर कधी कपल्समधील विचित्र घटना. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. शिवाय जागेवरून होणारे छोटेसे वाद मोठ्या संघर्षात रूपांतर होऊ शकतात, त्यामुळे प्रवासाता सहनशीलता आणि एकमेकांचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे असेही अनेकांनी म्हटले आहे.

टीप: दिल्ली मेट्रोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT