Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: कधी सुधारणार! चक्क मेट्रोत दारू प्यायला, अंडी खाल्ली, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मेट्रोमध्ये एका तरुणाने असं काही केलं ते पाहून प्रत्येकाचा संताप होत आहे. नक्की काय घडले पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Alcohol Drinking Video: दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणाने मद्यपान करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेने फक्त दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दिल्ली मेट्रो प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

मेट्रोमध्ये 'पार्टी मोड ऑन'!

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण सीटवर बसलेला दिसत आहे. तरुणाच्या हातात एक ग्लास दिसत असून त्यात दारु असते. तो अगदी बिनधास्तपणे मद्यपान करत आहे आणि त्याता आजूबाजूला असलेल्या इतर प्रवाशांचीही काही भिती वाटत नसल्याचे दिसत आहे. एवढ्यावर तो थांबत नाही तर बॅगमधून अंडी काढतो आणि ते खाण्यास सुरुवात करतो.

युवकाचा कृत्य पाहून नेटकरी संतापले

मेट्रोतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले,''हे काय आता नवीन प्रकरण'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्कीच कामचं टेंशन दिसत आहे'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''कारवाई होणार का?'' शिवाय काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया देत आपली मतं व्यक्त केली आहेत.

दिल्ली मेट्रोमध्ये ही पहिलीच वेळ नाही, अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात हा व्हिडिओ काही प्रवाशांनी शूट करत एक्सवरील @Info_4Education या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर ''दिल्ली मेट्रोमध्ये एक तरुण दारू पिताना आढळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

टीप: दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT