Pune Shocking News: रामनवमीचा सण सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. अशातच एका मिरवणुकीत घडलेल्या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मल्लखांबच्या प्रात्यक्षिकादरम्यान एका तरुणाच्या चेहऱ्यावर पेटती मशाल पडून तो गंभीर भाजला. सणाच्या दिवशी आनंदात रंगलेल्या या क्षणात क्षणार्धातच भीतीचे आणि चिंतेचे सावट पसरले.
व्हायरल (Viral) होत असलेल्या या घटनेत तुम्हाला मिरवणुक निघालेली दिसत आहे. मिरवणुक असल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे आणि मिरवणुकीत विविध गोष्टी लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. दरम्यान या मिरवणुकीत एक तरुण मल्लखांबचे प्रात्यक्षिक दाखवत असताना तो पेटती मशाल घेऊन काही कसरती दाखवत असतो. मात्र, ते सर्व होत असताना त्याच्या हातातून चेहऱ्यावर पेटती मशाल पडते आणि त्यात त्याच्या चेहऱ्याला आग लागलेली दिसत आहे.
घडलेली घटना सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या mhviralnews या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे मारुती मंदिर चौकातील घटना'' असे लिहिले आहे. आतापर्यंत या घटनेला लोकांनी अनेक लाईक्स दिले आहे शिवाय व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहिल्यानंतर अन्यही माध्यमांवर शेअर केला आहे. शिवाय अनेक लोकांनी या घटनेवर आपली मतं व्यक्त केलेली आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''लवकर बरा हो भावा'' तर काहींनी, आगीशी खेळ केला तर असं होतं'' अशा संतापजनक ही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप: सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.