Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या वाहनाचा दरवाजा नीट न लावल्यानं रस्त्यावर पडली महिला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Shocking Video: सोशल मीडियावर वाहन अपघांताचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेक भयानक अपघात असे असतात ते पाहून अक्षरश: मनात धडकी भरते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच एक अपघाताचा आहे.

Tanvi Pol

Nepal Viral Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक पर्यटक महिला धावत्या वाहनाचा दरवाजा नीट न लावल्यामुळे रस्त्यावर पडते आणि तिच्या शरीरावर गंभीर जखमा होतात. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाल धक्का बसला आहे. या घटनेनंतर रस्ते सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

धक्कादायक व्हिडिओ समोर आला

व्हिडिओमध्ये (Video) एक वाहन रस्त्यावरुन जात असताना त्यामधून अचानक एक महिला रस्त्यावर पडते. ज्या वाहनातून महिला खाली पडते ते वाहन काही अंतरावर जाऊन थांबते आणि समजते की त्या वाहनाचा दरवाजा उघडल्याने ती महिला धावत्या वाहनातून रस्त्यावर पडते. महिला पडल्यानंतर वाहनातून एक तिच्या दिशेने येतो तिला उठवतो आणि वाहनात बसण्यासाठी घेऊन जातो.

सुदैवाने त्या वेळी समोरुन किंवा पाठून वेगाने वाहन आले नाही. परंतू सर्व प्रसंग पाठीमागे असलेल्या एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे आणि तो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आलेला आहे. nebresultandnews0 या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पाहून सर्व हादरले

ही व्हायरल (Viral)घटना नेपाळमदील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजून येते. हा व्हिडिओ फेसूबक, ट्वीटर आणि अन्स सोशल मीडिया माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर विविध माध्यंमावर प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील अनेकांनी म्हटलं आहे,''ही एक धक्कादायक बाब आहे यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर वेळोवेळी दरवाजा बंद केला का तपासत जा'' तर काहींनी म्हटलं आहे,''नशीबाने वाचली'' अशा प्रकारे प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: भररस्त्यात घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT