Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सातारकरांचा नाद खुळा! परीक्षेला वेळेवर पोहचण्यासाठी लढवली नामी शक्कल, तरुणानं चक्क पॅराग्लाइडिंग करत गाठलं कॉलेज

Viral Exam Entry: सोशल मीडियावर सध्या सातारा जिल्ह्यातील एका घटनेने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे.ज्यात एका विद्यार्थ्यांने कॉलेजला जाण्यासाठी जो काही पर्याय निवडला आहे.नक्की काय घडले ते पाहाच.

Tanvi Pol

ओंकार कदम,साम टिव्ही

Student Parachute Landing: तुम्ही आत्तापर्यंत गाडीवर सायकलवर धावत अगदी घोड्यावरून सुद्धा कॉलेजला जाणारे विद्यार्थी बघितले असतील पण आमच्या साताऱ्यातील वाई तालुक्यामधील पसरणी या गावातील एका पठ्याने तर कमालच केली साधं सुद्धा नाही तर चक्क पॅराग्लायडिंग करत आकाशातून थेट कॉलेजमध्ये या पठ्याने एन्ट्री मारली आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल(Viral) होत आहे.या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी त्याच्या कॉलेजच्या बॅग सकट पॅराग्लाइडिंग करताना दिसत आहे.सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो मध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत.सातारा जिल्ह्यातील पसरणी गावातील ही घटना आहे.या गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी चक्क पॅराग्लायडिंग करून पेपरला पोहोचला.काही घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणी ला गेला होता.परंतु तिथे गेल्यावर त्याला समजलं की आज आपला कॉलेजमध्ये पेपर आहे

आता केवळ पंधरा ते वीस मिनिटात बाकी आहेत. नेमके त्यादिवशी वाई-पाचगणी रोड वरील पसरणी या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती आणि त्यामुळे परीक्षेच्या वेळेत घाट मार्गाने जाऊन पोहोचणे अशक्य झाले होते. आता आपली परीक्षा बुडणार या टेन्शनमध्ये हा विद्यार्थी असतानाच.पाचगणी मध्ये पाराग्लाइडिंग करणारे जीपी एडवेंचर्स या ग्रुपचे गोविंद येवले यांनी या विद्यार्थ्यांची मदत करण्याचे ठरवले. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत या विद्यार्थ्याला पसरणीचा घाट पार करून गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी घेतली

सरा कोणताच पर्याय नसल्यामुळे समर्थने सुद्धा भीत भीतच पॅराग्लायडिंग करत खाली जाण्याचा निर्णय घेतला.आणि अखेर हा पठ्ठ्या पॅराग्लाइडिंग करत परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेला. या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला मदत केली. त्यांनी त्याला पॅराग्लायडिंग करून सोडण्याचे ठरवले आणि त्याला सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले.

वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीचा सामना हा पर्यटकांना करावा लागतो. परंतु या वाहतूक कोंडीवर मात करत समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने थेट आकाशातून पॅराग्लायडिंग करतच कॉलेजमध्ये एन्ट्री मारल्याचा व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT