Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: परदेशी पाहुण्याचं महाराष्ट्र प्रेम! सिंहगड किल्ल्यावर स्वित्झर्लंडच्या पर्यटकाचा जय शिवरायांचा नारा

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका परदेशी पाहुण्याचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं काही पाहण्यासाठी मिळत जे पाहून तुम्ही खुष व्हाल.

Tanvi Pol

Foreign Visitor In India: सोशल मीडियावर सध्या दोन प्रकारचे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातील एकीकडे पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला काही मराठी तरुणांनी शिवीगाळ शिकवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, याच्या अगदी विरोधात एक अत्यंत प्रेरणादायक आणि सकारात्मक व्हिडिओ महाराष्ट्रातील मुरबाड तालुक्यातून समोर आला आहे.

मुरबाड तालुक्यातील व्हिडिओनं (Video) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मुरबाड तालुक्यातील नाणेघाटातील प्रसिद्ध अशा जीवधन ते वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंगसाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या पर्यटकाला मुरबाडच्या सह्यगिरी एडव्हेन्चर ग्रुपच्या सदस्यानं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र या घोषणा शिकवल्या.

या घोषणांना स्वित्झर्लंडच्या पर्यटकांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर या पर्यटकांनी व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेतला. सोशल मीडियात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ saamtvnews या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

या घोषणांचा परदेशी पर्यटकानेही उत्स्फूर्तपणे उच्चार केला आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण राष्ट्राभिमानाने भारून गेलं. याच क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल (Viral) होत आहे आणि त्यावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

टीप: महाराष्ट्रातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT