Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रयागराजला जाता आले नाही, सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये महाकुंभाचे जल टाकले, अन्...

Mahakumbh 2025 Viral Video: सोशल मीडियावर सध्या नोएडामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अवाक् व्हाल.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण डोक्याला हात मारत आहे.

Tanvi Pol

Noida Viral Video: गेल्या काही दिवसांपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ उत्साहात सुरू आहे.या महाकुंभमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपल्याला दिसत आहेत.दररोज एक तरी नवीन घटनांची महाकुंभ मेळा मोठ्या प्रमाणाच चर्चेत येत असतो.त्यातच सध्या अजून एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे,ज्यात प्रयागराजला जाता न आल्याने एका शहरातील सोसायटीच्या स्विमिंग पूलला त्रिवेणी संगम मानून त्या सोसायटीमधील सदस्यांनी तिथे डुपकी मारली आणि प्रार्थनाही केली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली घटना नोएडामधील असून व्हायरल होत असलेल्या घटनेत नोएडामधील एका सोसायटीमधील काही सदस्यांना महाकुंभासाठी जाता नाही आले,मात्र त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये असलेल्या स्विमिंगमध्ये आंघोळ करत प्रार्थना केलेली आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

@SachinGuptaUP या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपोलड केल्यानंतर लोकांनी अनेक लाईक्स केलेले आहे आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळालेले आहेत.ऐवढेच नाही तर अन्य प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केल्या आहेत,''जबरदस्त'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,''भारतात काहीही होऊ शकत'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: नोएडामधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Creamy Layer: OBC क्रिमी लेयरबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला मोठा झटका

Foot Massage: रात्री पायाच्या तळव्याला लावा फक्त एक चमचा तूप; मिळतील आश्चर्यकारक फायदे

NCMC Card Update : राज्यातील महिलांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, NCMC कार्डबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

SCROLL FOR NEXT