सोशल मीडियावर असंख्य व्हायरल रिल्स पाहायला मिळतात. कधी खळखळून हसायला लावणारे, कधी चक्रावून टाकणारे तर कधी भितीने थरकाप उडवणारे असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या माध्यमांवर पती- पत्नीच्या अतरंगी संवादाचा आणि त्यानंतर झालेल्या गमतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पती- पत्नीच्या जुगलबंदीशिवाय संसाराचा गाडा चालणे अशक्यच. छोट्या छोट्या कारणांवरुन होणारे वाद, भांडणे अन् पुन्हा एकत्र येण.. हाच सुखी संसाराचा मंत्र मानला जातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती- पत्नीचा एक मजेशीर प्रसंग दिसत आहे.
रेखा आणि अक्षय असे या व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) जोडीचे नाव आहे. रेखा पती अक्षयला जेवायला काय बनवू? असा प्रश्न विचारते. त्यावर अक्षय तिला काहीही बनव असे सांगतो. पतीचे हे नेहमीचे उत्तर ऐकून रेखा त्याची फजिती करण्याचे ठरवते. ती थेट गॅसवर तवा ठेवून बेसनच्या पिठाने कुछ भी अशी अक्षरे तयार करुन तळून काढते.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्नी तिने तयार केलेली ही अक्षरे ताटात ठेवून त्यांची छान सजावट करते. त्यानंतर ती पतीसमोर ते ताट पकडते. हा संपूर्ण प्रकार पाहून पतीही चक्रावून जातो. पत्नीने पतीला दिलेल्या या जशास तसे या उत्तराची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी पत्नीच्या या भन्नाट आयडियाचे कौतुक केले आहे. तर काही गृहिणींनी आम्हीही आता असेच उत्तर देवू.. अशा प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडिओवर दिल्या आहेत. काही जणांनी यापुढे कधीच काहीही बनव म्हणणार नाही.. असे म्हणत नवऱ्याची फिरकी घेतली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.