व्हायरल न्यूज

Bike Accident Video: गाडी शिकायची हौस महागात पडली... दोन दुचाकींचा भीषण अपघात; थरकाप उडवणारा VIDEO

Gangappa Pujari

Viral Accident Video:

वाहन चालवताना एक चूक किती महागात पडू शकते, याचे अनेक व्हिडिओ घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सोशल मीडियावर अशा भीषण अपघातांचे अनेक व्हिडिओही व्हायरल असतात. सध्या अशाच एका थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पत्नीच्या हट्टापायी पतीने तिला गाडी चालवायला दिली अन् भयंकर अपघात झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडिया म्हणजे (Social Media) असंख्य व्हिडिओंचा खजिना. आपल्याला एकापेक्षा एक भयंकर, मजेशीर आणि थरकाप उडवणारे व्हिडिओ माध्यमांवर पाहायला मिळतात. सध्या अशाच एक व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हट्टाला पेटलेल्या पत्नीला गाडी चालवायला दिल्यानंतर भीषण अपघात झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पती आपल्या पत्नीला गाडी शिकवताना दिसत आहे. पतीने सांगिल्याप्रमाणे ती उत्तम गाडी चालवण्याचा प्रयत्नही करते. मात्र अचानक गाडीने वेग घेतल्यानंतर महिला गोंधळून जाते अन् गाडी थेट रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनाला (Accident) धडकते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओच्या (Viral Video) सुरूवातीला तुम्ही पाहू शकता की, एक महिला डोक्यावर हेल्मेट वगैरे घालून, बाईक चालवत आहे. तर पती तिचा व्हिडिओ शूट करत आहे. पतीच्या सुचनेप्रमाणे बाईकवर बसलेली महिला गिअर टाकते आणि बाईक हळूहळू पुढे जाते.

थोड्या अंतरापर्यंत ती उत्तमरित्या गाडी नेते मात्र अचानक रस्त्यावर दुसरे वाहन येताना दिसताच पती तिला गाडी थांबवायला सांगतो. मात्र पत्नीला ब्रेक मारायला सांगूनही ती दुर्लक्ष करते अन् तशीच गाडी पळवते. शेवटी महिलेच्या गाडीचा दुसऱ्या दुचाकीसोबत भीषण अपघात (Accident) होतो.

व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता पाहता महिला गंभीर जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा भीषण अपघाताचा व्हिडिओ आत्तापर्यंत तब्बल १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रियाही दिल्यात. नेटकऱ्यांनी अशा चुका कधीही न करण्याचे आव्हान केले आहे. तसेच काही जणांनी वर्दळ नसलेल्या ठिकाणीच गाडी शिकवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT