सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते ती जुगाडांची. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन किंवा कल्पना शक्ती लढवून अशा काही गोष्टींची, उपकरणांची निर्मिती केली जाते की, पाहणारा ही थक्क होतो. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एका तरुणाने तलावातील पाणी शेतात पोहोचवण्यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढल्याचे दिसत आहे. काय आहे हा जुगाड, जाणून घ्या सविस्तर.
अवघड कामे सहजपणे करण्यासाठी, महागड्या उपकरणांचा वापर सोडून शेतीची कामे करण्यासाठी अनेक जुगाड केले जातात. भारतात अशा जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे जबरदस्त जुगाड सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. सध्या अशाच एका भन्नाट जुगाडाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तलावातील पाणी शेतात पोहोचवण्यासाठी हा जुगाड केला असून त्याच्या या कल्पनाशक्तीचे नेटकऱ्यांनीही जोरदार कौतुक केले आहे.
तलावातील पाणी हे शेतात सोडण्यासाठी पाईप जोडला आहे. पाईपचे एक टोक हे बाईकला जोडलंय तर दुसरं टोकं हे तलावातील पाण्यात ठेवले आहे. बाईक सुरू करतानाच तलावातील पाणी हे बाहेर येताना दिसत आहे. आपण सोशल मीडियावर ट्रॅक्टर किंवा ट्रकचा वापर करून शेतीची कामे करण्यासाठी अनेक भन्नाट जुगाड केले जातात. तशाच प्रकारचा हा जुगाड असून नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर (Viral Video) नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला असून तरुणाच्या या आयडियाचे कौतुक केले आहे. आत्तापर्यंत तब्बल आठ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून आपल्या देशात टॅलेंटची कमी नसल्याचे अनेकांनी म्हणले आहे. तसेच काही जणांनी शेतकऱ्यांची पोर काहीही करु शकतात.. अशा बोलक्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.