DJ fell on people dancing Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: पोर नाचण्यात दंग होती अन् घडलं भयंकर... DJ थेट तरुणांवर कोसळला; धक्कादायक VIDEO

DJ fell on people dancing Viral Video: मिरवणूक सुरू असतानाच डीजे तरुणांवर कोसळल्याने ४ जण जखमी झाले.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Viral Video:

सध्या कोणताही सण असो किंवा घरगुती समारंभ असो, डीजे लावून मनसोक्त थिरकले पाहिजे असा प्रत्येकाचा हट्ट असतो. मात्र डिजेच्या आवाजाने अनेक आजारांनो तोंड तर द्यावे लागतेच, त्याचबरोबर अनेक अपघातही होतात. उत्तरप्रदेशमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीजे लावून मिरवणूक सुरू असतानाच डीजे तरुणांवर कोसळल्याने ४ जण जखमी झाले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) दुर्गापुजेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये विसर्जन मिरवणूकीत ही घटना घडली. विसर्जन मिरणुकीत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणांवर डीजे कोसळल्याने हा अपघात घडला. रविवार (२९, ऑक्टोंबर) हा अपघात घडल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर (viral Video) व्हायरल होत आहे. आझमगडमध्ये काही लोक दुर्गा विसर्जन करण्यासाठी जात होते. त्यावेळी मिरवणूकीत 12-15 लोक डीजेवर नाचत होते. साऊंडच्या दणदणात 'अभी तो पार्टी शुरू हुई है' हे बादशहाचे गाणे वाजत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र अचानक असं काही घडतं की सर्वांचाच गोंधळ उडतो. गाण्याच्या आवाजामुळे डीजे दोनदा हलला मात्र लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर थोडे पुढे जाताच डीजेच्या गाडीतील सर्व साऊंड नाचणाऱ्या तरुणांच्या अंगावर कोसळले. अचानक साऊंड अंगावर पडल्याने तरुणांना पळता आले नाही, ज्यामुळे अनेकजण त्याखाली दबले गेले. घटनेनंतर इतर लोकांनी तात्काळ डीजे हटवून लोकांना बाहेर काढले.

यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत, तर आणखी काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डीजेचा मालक आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT