Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नदी स्वच्छतेची टेक्नॉलॉजी बघून आनंद महिंद्रा 'इम्प्रेस'; देशासाठी फायनान्स करण्याची दाखवली तयारी

Anand Mahindra: एका नवीन टेक्नोलॉजीचे कौतूक केले आहे. याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anand Mahindra Post on Viral Video

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक टेक्नोलॉजीचा वापर करत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत टेक्नोलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्याच्या वेळेला देशभर प्रत्येक क्षेत्रात टेक्नोलॉजीमध्ये अनेक सुधारणा होताना आपल्याला दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ,ज्यात नदीच्या स्वच्छेतेसाठी टेक्नोलॉजीचा उत्तम वापर करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. एखादा सामाजिक विषय असेल किंवा चित्रपटाचे कौतुक अशा सर्वच आशयांच्या पोस्ट शेअर ते करत असतात. नुकताच आनंद महिंद्रानी एक व्हिडिओ त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म एक्स अकांउटवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी एका नवीन टेक्नोलॉजीचे कौतूक केले आहे. याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केलीय.

या व्हिडिओत आपल्याला एक नदीचा परिसर दिसत आहे. या नदीत पिवळ्या रंगाची मशीन आहे, ज्या मशीनच्या साहाय्याने नदीतील सर्व कचरा वेगळा होऊन मशीनमध्ये ओढला जातोय. मशीनचा आकार जास्त मोठा नसून उत्तम पद्धतीने सर्व कचरा गोळा करत आहे.

'नद्या स्वच्छ करण्यासाठी स्वायत्त रोबोट. असून ते चिनचे असल्याचे वाटत आहे?आपल्याला हे इथेच बनवायचे आहे...आत्ताच...जर कोणतेही स्टार्टअप असे करत असतील तर...मी गुंतवणूक करण्यास तयार आहे...'असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.

या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'आनंद सर हे खरे शार्क आहेत जे शार्क टँकमध्ये नाहीत' तर आणखी एका यूजरने लिहिलेय'फक्त महिंद्रा भारतात बनवू शकते. कृपया करा सर' तसेच व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT