Helmet Detection System : हेल्मेटशिवाय सुरूच होणार नाही स्कूटर! ओलाची नवीन जबरदस्त टेक्नोलॉजी

Ola New Feature : भारतातील आघाडीची OLA इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामुळे भविष्यात दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल.
Helmet Detection System
Helmet Detection SystemSaam Tv
Published On

Safety Feature In Ola : सुरक्षित प्रवासासाठी नवीन सुरक्षा फीचर्स आणण्यासाठी अनेक कंपन्या संशोधन करत आहेत. अशीच एक सुविधा कंपनी आपल्या स्कूटरमध्ये देऊ शकते. हे फीचर्स काय आहे? चला जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील आघाडीची OLA इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामुळे भविष्यात दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल. हेल्मेटशिवाय स्कूटर (Scooter) सुरू होणार नाही असे केले तर तुमचा विश्वास असेल? याचे उत्तर बरेच लोक नकारार्थी देतील. पण लवकरच असे होऊ होणार आहे, स्कूटर चालवण्यापूर्वी हेल्मेट घातले नाही, तर दुचाकी अजिबात सुरू होणार नाही.

Helmet Detection System
Ola Electric Car : ओला कारची डिझाइन लीक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स; टेस्लाला देणार तगडी टक्कर

OLA इलेक्ट्रिक (Electric) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एका नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे रायडरने हेल्मेट घातले आहे की नाही हे सांगेल. जर दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल तर हे तंत्रज्ञान हेल्मेट न घालण्याचा इशारा देईल. असा अंदाज वर्तवला जात आहे की ओला हे तंत्रज्ञान त्यांच्या विद्यमान इलेक्ट्रिक स्कूटर तसेच आगामी इलेक्ट्रिक बाइक्समध्ये वापरू शकते . हे तंत्रज्ञान आणल्यानंतर ओलाच्या ग्राहकांना काय फायदा (Electric) होणार आहे ते जाणून घेऊया.

हेल्मेट शोधण्याची यंत्रणा कशी काम करेल?

ओलाची हेल्मेट डिटेक्शन सिस्टीम कॅमेऱ्याचा वापर करून हेल्मेट घातला आहे की नाही हे तपासेल. त्यानंतर ही माहिती व्हेईकल कंट्रोल युनिटला पाठवेल (VCU म्हणजे EV ला ECU म्हणजे ICE व्हेईकलसाठी) आणि नंतर ती मोटार कंट्रोल युनिटकडे पाठवते, जे वाहन RIDE मोडवर स्विच करायचे की नाही हे ठरवते.

Helmet Detection System
Ola Vs Ather : Ather देणार Ola ला टक्कर ! सर्वात स्वस्त, रेंजमध्ये मस्त; जाणून घ्या किंमत

साइड स्टँड

काही वर्षांपूर्वीपर्यंत साईड स्टँडमुळे अनेक अपघात होत होते, मात्र नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने ते दूर करण्यात आले आहे. आता बहुतांश मोटारसायकलमध्ये स्टँड उघडताच दुचाकी थांबते, तर बाजूचे स्टँड उघडे असल्यास मोटारसायकल सुरूही होत नाही. त्याच प्रकारे, हेल्मेट शोधण्याची यंत्रणा देखील कार्य करू शकते, परंतु सीट बेल्ट न घातल्यास वाहनांमध्ये वाजणारा अलार्म सारख्या केवळ धोक्याची सूचना देणारी यंत्रणा त्यात आढळू शकते.

काय फायदा होईल

ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू होतो. निष्काळजीपणा अपघातांना कारणीभूत आहे. बहुतांश दुचाकी चालक वाहन चालवताना हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे अपघातादरम्यान गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढतो. मात्र या प्रकारचे सेफ्टी फीचर दुचाकीमध्ये आणले तर निश्चितच गंभीर अपघात होण्याचा धोका कमी होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com