Mumbai Local Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलच्या टपावर बसून स्टंट करणं भोवलं; तरुणासोबत घडलं भयंकर

Viral Video: मुंबई लोकलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबई लोकलमध्ये प्रवासी अनेकदा दरवाजाला लटकून प्रवास करतात. असाच एका प्रवाशांने ट्रेनच्या टपावर चढून भयानक स्टंट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Local Viral Video Of Passenger Perform Stunt:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक लोक काहीतरी अंतरगी आणि भीतीदायक स्टंट करतात. यात अनेकदा मुंबई रेल्वेतील प्रवाशांनी दाराला लटकून प्रवास केलेल्याचे व्हिडिओ असतात. असाच एक ट्रेनवर चढून स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (latest News)

ट्रेनमध्ये अनेकदा जागा नसल्यावर लोक दरवाज्याला लटकून प्रवास करतात. परंतु त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अनेकदा तर या अशा अतरंगी प्रयत्नांमुळे अनेक प्रवाशांना रेल्वेतून पडून मृत्यूदेखील झाला आहे. असाच एका प्रवाशांने भयानक स्टंट केला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील हा व्हिडिओ आहे. परंतु नक्की ठिकाण कोणतं हे अजूनही समजू शकले नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक प्रवाशी ट्रेनच्या बाहेर लटकलेला दिसत आहे. प्रवाशी ट्रेनच्या दरवाज्याला लटकून नंतर ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. यावेळी अजून एकजण याचा व्हिडिओ शूट करत आहे. ट्रेनच्या छतावर चढताना ही प्रवाशी काही आक्षेपार्ह हावभाव करताना दिसत आहे. त्यावेळी मध्येच छतावरुन आगीचा ज्वाळा येताना दिसत आहे. परंतु त्यानंतरही हा तरुण उठून वेगवेगळे हावभाव करताना दिसत आहे. हा स्टंट त्याच्या जीवावर बेतू शकतो हेदेखील त्याला कळत नसल्याचे दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'जीवाची पर्वा नसलेले प्रवासी हे असं करतात', 'हे सगळं भीतीदायक आहे', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT