Mother Son Viral Video: जगातील सर्वात सुंदर नाते म्हणजे आई आणि मुलाचं नाते. आपल्या लेकासाठी आई आयुष्यभर कष्ट करत असते. त्याच्या उज्वल भविष्यासाठी कायम धडपडत असते. आईचा जितका आपल्या मुलावर जीव असतो. तितकेच मुलाचेही आईवर प्रेम असते.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची कथा, चला जाणून घेवू...
माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक चिमुकला वादळी वाऱ्याने थैमान घातले असताना आपल्या आईचे दुकान वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. (Latest Marathi News)
व्हायरल व्हिडिओमध्ये तुफान वादळी वारा सुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे एका महिलेचे रस्त्याच्या कडेला असलेले दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. तर वाऱ्यामुळे दुकानावरील कागदही जोराने उडून जात आहे. यावेळी महिलेच्या शेजारी उभा असलेला चिमुरडा कागद उडून जावू नये म्हणून त्याला लोंबकळत पकडून उभा असल्याचे दिसत आहे.
चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची (Social Media) मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.
हा सुंदर व्हिडिओ strictlyformeme नावाच्या इंस्टाग्राम (Instargram) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. "जबाबदारी पाहून मुलगा माणूस बनतो" असा सुंदर कॅप्शन या व्हिडिओल देण्यात आहे. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून नेटकरी मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Son Helps To Mother In Storm)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.