Tiger enters village in Uttar Pradesh Pilibhit sleeps on a wall rescued by forest officers later Watch Viral Video  Saamtv
व्हायरल न्यूज

Trending Video: वाघोबाची गावात रॉयल एन्ट्री, घराच्या भिंतीवर झोपला, काही केल्या हालेना; अखेर... थरारक VIDEO

Trending Tiger Video: उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आला. गावकरी अन् वाघांच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Tiger In Village Viral Video:

मानवाने जंगले तोडून मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट उभारण्यास सुरूवात केली अन् वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. मनुष्याच्या या आक्रमणानंतर नाईलाजाने वन्यजीवांनी शहरांकडे, गावांकडे मोर्चा वळवत मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव केला. शहरात, गावात बिबट्या, वाघाचे दर्शन झाल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अनेकदा हे प्राणी हल्लाही चढवतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका बाघोबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

वाघोबाची गावात एन्ट्री!

सोमवारी संध्याकाळी (२५, डिसेंबर) उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आला. मध्यरात्री हा वाघ थेट गावात शिरला अन् भितींवर चढून बसला. सकाळी उठून हा प्रकार पाहिल्यानंतर गावकरीही भयभीत झाले. गावात वाघ आल्याचे समजताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. या वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली.

गावकऱ्यांची घाबरगुंडी

विशेष म्हणजे हा वाघ जाण्याची गावकरी वाट पाहत होते. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाघ काही जागचा हालेना. गावकरी अन् वाघांच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

व्हिडिओ व्हायरल!

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, गावातील एका भिंतीवर वाघ आरामात बसल्याचे दिसत आहे. वाघोबाला पाहायला गावकऱ्यांनी तौबा गर्दी केली असून त्याला पळवून लावण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. गावकऱ्यांचा, आरडा- ओरडा, गोंधळ ऐकूनही वाघ मात्र बिंधास्त घराच्या भिंतीवर आराम करताना दिसत आहे.

कधी उभा राहून, कधी अगदी आरामात झोपून हा वाघ गावकऱ्यांचा हा गोंधळ पाहत आहे. गावकरी मात्र वाघोबाच्या भितीने घाबरुन त्याचे लांबून दर्शन घेताना दिसत आहेत. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागानेही शर्थीचे प्रयत्न केले. त्याने कोणावर हल्ला चढवू नये म्हणून जाळीही मारल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

अखेर या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुंगीच्या इंजेक्शनचा वापर केला. गुंगेचे इंजेक्शन देऊन वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला कसेबसे पिंजऱ्यात घातले अन् गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला! वाघोबा अन् गावकऱ्यांच्या या ग्रेट- भेटीचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT