Viral Wedding Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'शुभमंगल' करताना जरा सावधान... लग्नाच्या हॉलमधून १० सेकंदात १० लाख रुपये पळवले; VIDEO

Viral Wedding Video: चोरट्याने लग्नाच्या हॉलमधून तब्बल १० लाख रुपयांची पैशांची बॅग चोरल्याचे दिसत आहे. चोरट्याची हातचलाखी अन् ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Gangappa Pujari

Viral Video:

प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी आपल्या सामानाची, मौल्यवान वस्तूंची, काळजी घेण्याच्या सूचना वारंवार केल्या जातात. अशा ठिकाणी चोरट्यांचा सुळसुळाट असतो. काही समजायच्या आत, अगदी काही सेकंदात चोर हात साफ करुन जातात. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चोराने लग्नाच्या हॉलमधून १० लाखांची बॅग पळवल्याचे दिसत आहे.

लग्न सोहळा म्हणजे दोन कुटुंबातील आनंदाचा क्षण. लग्न सोहळ्याची गडबड, धावपळ अन् उत्साह काही औरचं असतो. भव्य हॉल, फुलांची आरास, लाईटचा झगमगाट अशी सगळी जय्यत तयारी लग्नाच्या हॉलमध्ये पाहायला मिळते. मात्र अशा गडबडीतही आपल्या वस्तूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण लग्नाच्या हॉलमध्ये चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका चोरट्याने लग्नाच्या हॉलमधून तब्बल १० लाख रुपयांची पैशांची बॅग चोरल्याचे दिसत आहे. चोरट्याची हातचलाखी अन् ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही चोरीची घटना मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक चोर सोफ्यावर ठेवलेल्या बॅगवर लक्ष ठेऊन उभा आहे. हळूहळू सोफ्याच्या जवळ येत तो ती बॅग उचलतो अन् निघून जातो. हे सर्व इतक्या सहजपणे होते की हॉलमध्ये बसलेल्या कोणाच्याही हे लक्षात येत नाही. चोराने पळवलेल्या त्या पिशवीत १० लाख रुपये आणि दागिने असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT