MP Assembly News: बापरे! गळ्यात सुतळी बाँम्बची माळ घालून काँग्रेस आमदाराची विधानसभेत एन्ट्री; नेमकं कारण काय?

MP Assembly News: आमदारांच्या ह्या एन्ट्रीने विधानसभेत नेते, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एका फटाका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ अशा प्रकारे गळ्यात सुतळी बाँम्ब घालून त्यांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे.
MP Assembly News:
MP Assembly News: Saamtv
Published On

Madhya Pradesh News:

मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार रामकिशोर दोगने हे गळ्यात सुतळी बाँम्बच्या माळा घालून विधानसभेत पोहोचल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आमदारांच्या ह्या एन्ट्रीने विधानसभेत नेते, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एका फटाका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ अशा प्रकारे गळ्यात सुतळी बाँम्ब घालून त्यांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Harda Blast) झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, सखोल चौकशी व्हावी.. याच मागणीसाठी स्थानिक आमदार रामकिशोर दोगने हे गळ्यात सुतळी बाँम्बच्या माळा घालून विधानसभेत येत निषेध नोंदवला.

यावेळी काँग्रेस आमदार रामकिशोर दोगने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलनही केले. तसेच भाजप नेते कमल पटेल यांच्या संरक्षणाअंतर्गत हा कारखाना चालू होता. या घटनेने अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. सरकारने या घटनेकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, अशी मागणी यावेळी केली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MP Assembly News:
घरावर लिंबू, बाहुली... ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-यांचा भानामतीचा दावा, पाेलिसांत धाव

दरम्यान, फटाक्याच्या फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत करण्यात आली आहे, तर या दुर्घटनेतील गंभीर जखमी असलेल्यांना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तसेच अन्य जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

MP Assembly News:
Nanded News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गटाची निदर्शने; निर्णयाचा केला निषेध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com