Thakrey Brothers Saam Tv
व्हायरल न्यूज

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

Viral Video : हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्याच्या आनंदात ठाकरे बंधू २० वर्षांनी एकत्र आले. वरळीत झालेल्या विजयी सोहळ्यात भावनिक वातावरण पाहायला मिळालं. समर्थकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला.

Alisha Khedekar

महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी हिंदी भाषिक वादाने राजकारणात देखील शिरकाव केला. सरकारने काढलेला हिंदी सक्तीचा जीआर महायुती सरकारने मोडीस काढत महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेला दिलासा दिला. महाराष्ट्रात हिंदी नको यासाठी ठाकरे बंधूनी कंबर कसली आणि हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले.

या घटनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी शनिवारी वरळीत झालेल्या विजयी सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एकत्र एका मंचावर महाराष्ट्र्राला दिसले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातील जनतेला अश्रू अनावर झाले. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी वरळीत डोम सभागृहात पार पडलेल्या विजयी सोहळ्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक उपस्थित होते. जेवढी गर्दी सभागृहात होती तेवढी गर्दी सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळाली. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने मनसैनिक आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. घरी बसलेल्या नागरिकांनी देखील या विजयी सोहळ्याचा आनंद घेतला.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिलेला हा विजयी सोहळा पाहताना अश्रू अनावर झाले. ठाकरे बंधू मंचावर एकत्र येताच तिच्या डोळ्यातून पाणी आलं. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचं ठाकरे बंधूंवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. मात्र ही एकजूट राजकारणात दिसणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॅन्सर झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं

Vatana Bhaji Recipe: वटाण्याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची?

Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, १० गावांतील नागरिकांची भीतीने पळापळ

Neelam Kothari: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विमानात घडला विचित्र प्रकार; सोशल मीडियावर पोस्ट करत केला धक्कादायक खुलासा

Benefits Of Amla In Pregnany: गरोदर महिलेने आवळा खावा की नाही?

SCROLL FOR NEXT