Telangana News Saam Tv
व्हायरल न्यूज

Telangana News: भर मांडवातच लग्न मोडलं! कशावरून...कशावरून? एवढ्याशा मटणाच्या नळीवरून

Telangana: लग्न म्हटल्यावर वधू आणि वर दोन्हीकडील पाहुण्यांची लगबग. नवरदेवासोबत आलेल्या वऱ्हाड्यांचा चांगला पाहुणचार करायचं ठरतं. परंतु एका लग्नात जेवणात मटणाची नळी न दिल्याने लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Telangana Wedding News:

लग्न म्हटल्यावर वधू आणि वर दोन्हीकडील पाहुण्यांची लगबग. नवरदेवासोबत आलेल्या वऱ्हाड्यांचा चांगला पाहुणचार करायचं ठरतं. पण काही वऱ्हाड्यांचे विचार थोडे हटके आणि विचित्रच असतात. काही तर फक्त जेवणावर ताव मारायलाच जातात. अनेकदा जेवण चविष्ट झालं नाही तर, वऱ्हाडी रागावतात देखील. कधीकधी तर तुफान हाणामाऱ्याही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लग्नात पनीर आणि रसगुल्ला मिळाला नाही म्हणून भांडणे झाली होती. त्यानंतर आता जेवणात मटणाची नळी न दिल्याने लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे. (Viral News)

तेलंगणामध्ये एका लग्नात जेवणात मटणाची नळी न दिल्याने लग्न मोडले आहे. मटणाच्या तुकड्यावरुन वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे लग्न न लावून देताच नवरा- नवरीला घरी परतावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरी निजामाबाद, तेलंगणाची होती. तर नवरा जगतियाल जिल्ह्यातील रहिवासी होता. या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात करण्याचे ठरले. त्यानुसार, नवरीच्या कुटुंबियांनी लग्नात मासांहारी जेवणाची व्यवस्था केली होती. लग्नात पाहुण्यांनी जेवणावर ताव मारण्यास सुरुवात केली. परंतु, जेवत असताना ताटात मटणाची नळी न दिल्याने पाहुणे नाराज झाले. त्यांच्यात भांडण सुरू झाले.

लग्नात जेवणात मटणाची नळी दिली नाही, असा आरोप पाहुण्यांनी केला होता. त्यामुळे वर आणि वधूच्या कुटुंबियांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घ्यावी लागली. पोलिसांनी नवऱ्याच्या कुटुंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरीच्या घरच्यांनी आम्हाला जेवणात मटणाची नळी न देऊन आमचा अपमान केला, असे नवऱ्याच्या कुटुंबियांनी सांगितले. यावर नवरीच्या कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितले होते की जेवणात मटणाचा समावेश केला नाही. अखेर या वादामुळे लग्नच मोडले. लग्न न करताच नवरा नवरी घरी परतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा काटेवाडीत निषेध; ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

SCROLL FOR NEXT