Viral Post Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Post: शेवटच्या क्षणी ही तपासलेत विद्यार्थ्यांचे पेपर; कामाची तत्परता पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Teacher Viral Post: सोशल मीडियावर एका आदर्श शिक्षकाची पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही आपल्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Emotional Viral Post

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्वाचे स्थान असते. त्यातही शिक्षकाची तुलना आपण अन्य कोणाशीही करु शकत नाही.शिक्षक केवळ शिकवत नाही तर आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगामधून पार पडण्यासाठी सक्षम बनवतो. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला आपला आदर्श मानत असतो त्यामुळे शिक्षक सर्व जबाबदाऱ्या मोठ्या समर्पणाने पार पाडतो. अशातच सोशल मीडियावर एका आदर्श शिक्षकाची पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही आपल्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासलेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या फोटो स्वत:हा शिक्षकाच्या मुलीने शेअर केला आहे. सँड्रा वेनेगास असे या मुलीचे नाव आहे. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिने सर्व प्रसंग सांगितला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्या वडिलांची तब्येत जेव्हा बिघडली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यावेळीही त्यांनी एका शिक्षकाची भुमिका पार पाडली. रुग्णालयात जाताना त्यांनी सोबत लॅपटॉप आणले. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तपासू शकतील. जेव्हा माझ्या वडिलांनी सर्व असाइनमेंट तपासून पूर्ण केल्या तेव्हा त्यांच्या मनाला शांती मिळाली पंरतू या घटनेच्या दुसऱ्य दिवशी वडिलांचे निधन झाले.

व्हायरल पोस्ट आणि फोटो इन्स्टाग्रामवरील @notcommonfacts नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया या पोस्टवर येत आहेत तसेच प्रत्येक यूजर्स ही पोस्ट वाचून भावूक झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT