Carrying tap-enabled cards in crowded places can be risky; experts suggest disabling the feature via bank apps. Saam Tv
व्हायरल न्यूज

Credit Card: गर्दीत उभे राहाल, कंगाल व्हाल? टॅप अँड पे सुरू असल्यास खातं होईल रिकामी?

Fact Check: तुम्ही गर्दीत जात असाल तर सावध व्हा...कारण, तुमच्या खिशात क्रेडिट, डेबिट कार्ड असेल तर बँक खातं रिकामं होऊ शकतं...काही स्कॅमर्स गर्दीत तुमचे पैसे चोरतायत असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली.

Sandeep Chavan

तुमच्या खिशात क्रेडिट डेबिट कार्ड असेल तर स्कॅमर्स सहज तुमच्या खात्यातील पैसे गायब करू शकतात...होय, असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे तुम्ही गर्दीत फिरत असाल तर हे तुमच्यासोबतही घडू शकतं असा दावा केलाय...त्यामुळे सगळेच हैराण झालेयत...पण, असं होऊ शकतं का...? कार्ड खिशात असेल तर कुणीही तुमचे पैसे काढू शकतं का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे..

तुमच्या खिशात किंवा बॅगेत क्रेडिट डेबिट कार्ड असेल तर तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. घोटाळा करणारे गर्दीच्या ठिकाणी तुमचे पैसे सहज चोरू शकतात..

हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालंय...खरंच गर्दीच्या ठिकाणी असं कुणीही आपल्या खात्यातून पैसे गायब करू शकतं का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत सायबर एक्स्पर्ट अधिक माहिती सांगू शकतात...त्यामुळे अशी फसवणूक होऊ शकते का...? हे आम्ही जाणून घेतलं..

टॅप अँड पे करणाऱ्या क्रेडिटकार्ड धारकांनी सावधान राहावं

स्कॅमर्स तुमच्या कार्डमधून सहज तुम्हाला गंडा घालू शकतात

आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डला टॅप अँड पे ऑप्शन

बँकेच्या अॅपमधून टॅप अँड पे ऑप्शन बंद करू शकता

5 हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही...त्यामुळे सहज पैसे काढणं शक्य आहे...मात्र, हे सगळ्याच कार्डसाठी नाहीये...काही डेबिट, क्रेडिट कार्डलाच ऑप्शन आहे...त्यासाठी तुम्ही बँकेच्या अॅपमधून टॅप अॅण्ड पे ऑप्शन बंद करून ही फसवणूक रोखू शकता...आमच्या पडताळणीत गर्दीत स्कॅमर तुमचे पैसे गायब करू शकतो हा दावा सत्य ठरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT