Tamilnadu Biker Stunt Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Biker Stunt Viral: सांगा बरं, चूक कोणाची! घाटातील वळणाच्या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा 'शहाणपणा'|Video Viral

Tamilnadu Biker Stunt Viral : घाटवरील वळणाच्या रस्त्यावर वाहन चालवणं खूप धोकेदायक असतं. वळणाच्या रस्त्यावर प्रत्येक क्षणी सावध राहत वाहन चालवावे लागते. नाहीतर थोडी चूक झाली तरी मोठी दुर्घटना होऊ शकते.

Bharat Jadhav

वाहन चालवताना अनेकजण वाहतुकीचे नियम मोडत बेशिस्तपणे वाहने चालवातात. त्यामुळे मोठ्या दुर्घटना होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक बाईक चालक चढाव चढणाऱ्या ट्रकसमोर येतो. त्यानंतर ट्रक चालक त्याला चांगलीच अद्दल घडवतो. दुचाकी स्वारांचा एक ग्रुप घाटातून कुठेतरी जात होता. त्यावेळी एक बाईक स्वार बेशिस्तपणे दुचाकी चालवत होता.

समोरील वाहनांना कट मारून चकवा देत होता, असेच एका वळणावर दुचाकी चालक चढाव चढणाऱ्या ट्रकला कट मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ट्रक चालकाने त्याच्या बाईकला उडवलं. यात बाईकचं मोठं नुकसान झालं. मात्र यानंतर ट्रकचालकाने जे काही केले त्यात चूक कोणाची, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. ट्रक चालकाला माहित होते की, एक दुचाकी आपल्या वाहनाच्या चाकाखाली आली आहे, तरीही त्याने वाहन संथ गतीने पुढे नेले.

ट्रक आणि बाईकच्या नंबर प्लेटवरून असे दिसून येते की हा व्हिडिओ तामिळनाडूमधील आहे. तेथील कुठल्यातरी घाटात हा रेकॉर्ड करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकीस्वारांचा एक ग्रुप डोंगराळ भागातून जात आहे. यावेळी एक दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला समोरून कट मारून पुढे जातो.

मात्र मागून येणारा दुचाकीस्वार दुसऱ्या ट्रकच्या अगदी समोर येतो. व्हिडिओमध्ये दिसतंय की, दुचाकीस्वार आपली बाईक ट्रकखाली येण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रक चालक ट्रक न थांबवता ट्रकला कमी वेगाने पुढे नेतो. त्यामुळे दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाला धडकून बाईकच मडगार्ड तुटते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, यानंतर दुचाकीस्वार वळतो आणि आरडाओरडा करतो, परंतु ट्रक चालक त्याच एक ऐकत नाही.

ट्रक चालकाच्या या कृतीने दुचाकीस्वार पूर्णपणे अवाक होतो. व्हायरल झालेला हा व्हिडिओ ३८ सेकंद चालतो. पण यातून वाहन चालवण्याबाबत वाढत चाललेली बेशिस्तपणा दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh च्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. य़ुझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, बाइकर आणि ट्रक ड्रायव्हरमधील संघर्ष. ही पोस्ट जवळपास सहा लाख वेळा पाहिली गेलीय.

तर यात कोणाची चूक होती यावर कमेंट सेक्शनमध्ये वाद सुरू झालाय. काही ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यातील बहुतेक जण ही बाईकस्वारांची चूक असल्याचे मानत आहेत. एका युझरने कमेंट केली की, ही नक्कीच बाईकरची चूक आहे. ट्रक चालकाने उतारावर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तर ट्रक दरीत कोसळले असते. त्यामुळे गाडी संथ गतीने पुढे जाणे योग्य वाटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT