Viral Video  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : 'तुम्ही मुली आहात का?' फुटबॉल सामना हरल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाडूंना लाथाबुक्यांनी तुडवलं, व्हिडिओ व्हायरल

coach beaten to student : फुटबॉल सामना हरल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाडूंना लाथाबुक्यांनी तुडवल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोशल मीडियावर तामिळनाडूतील एका शाळेच्या फुटबॉल प्रशिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फुटबॉल प्रशिक्षक हा मुलांचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी तुडवत आहे. सामन्यात पराभव झाल्यानंतर या प्रशिक्षकाने मुलांना मारहाण करून शिक्षा दिल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेले आहेत. प्रशिक्षक रांगेत बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. काही जणांचे केस ओढून तर काही जणांचे थोबाडीत लगावून मारहाण करत आहे. खेळाडू देखील अवाक्षर न काढता मार खाताना दिसत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, या संघाचा प्रशिक्षक संघातील गोलकीपरला विचारतो की, तुम्ही मुली आहात का? दुसऱ्या संघाने इतका स्कोर कसा केला? हा प्रशिक्षक दुसऱ्या एका खेळाडूला विचारतो की, 'तुझ्या जवळून बॉल कसा निसटला? थोडा दबाव आला तर तुम्हाला खेळता जमत नाही का? तर एका विद्यार्थ्याला त्याने विचारलं की, तुमच्यामध्ये काही ताळमेळ नाही?'. दरम्यान, रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील मेट्टूरमधील सरकारी शाळेतील आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव अन्नामलाई असल्याची माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर प्रशिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी प्रशिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने म्हटलं की, विद्यार्थ्यांना मारहाण करणारा कोच तुरुंगात असायला हवा'. दुसऱ्याने म्हटलं आहे की, 'दुर्दैवाने सांगावे लागत आहे की, ही पहिली घटना नाही. मी आता युवा प्रशिक्षकांना खराब कामगिरीनंतर खेळाडूंना ओरडताना पाहतो. मलाही शाळेत असताना अशा प्रकारच्या प्रशिक्षकाचा सामना करावा लागला होता. आताही स्पर्धेत पराभव झाल्यानंतर प्रशिक्षकाकडून खेळाडूंना अपमानित केलं जात आहे. हा प्रकार पाहून वाईट वाटतंय'.

'तिसऱ्याने म्हटलं की, 'हा व्यक्ती कोण आहे? त्या फुटबॉल खेळात त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. जिल्हा शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, 'आम्ही शिक्षकाला निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT