Super Typhoon Yagi Hits China  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : खुर्च्या हवेत गरगर फिरल्या, बाल्कनी उडाली; महिला पडली, चीनमधील विध्वंसाचं भयानक दृश्य VIDEO

Super Typhoon Yagi Hits China : चीनमधील यागी वादळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचं दिसतंय.

Rohini Gudaghe

मुंबई : चीनमधील यागी वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये विनाशाचा तांडव पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, नदीचा व्हिडीओ काढणारी एक व्यक्ती जोरदार लाटांमध्ये वाहून गेलीय. याशिवाय या वादळामुळे मोठमोठी झाडे पडत आहे, इमारती देखील कोसळतं आहे. खुर्च्या देखील हवेत गरगर फिरत असल्याचं दिसतंय. या विध्वंसाचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.

चीनमधील यागी वादळाचा व्हिडिओ

सुपर टायफून यागी हे २०१४ मधील आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली वादळ मानलं जातंय. या वादळाने चीन, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाममध्ये कहर केलाय. यूजर्स मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या वादळाशी संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट करत आहेत. व्हिडिओमध्ये चीनच्या कियानतांग नदीतील उसळणाऱ्या लाटा दिसत आहेत. या वादळात अडकलेले लोक दिसत आहेत.

विध्वंसाचं भयानक दृश्य

या व्हिडिओमध्ये शहरातील परिस्थिती समोर आलीय. काही लोक शांतपणे रस्त्यावरून जात होते, तर काही आराम करत होते. त्यानंतर अचानक वादळ आलं आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालाय. चीनमधील या भीषण वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या व्हिडिओत दिसतंय की, स्कूटरवर बसलेली एक महिला जोराच्या वाऱ्यामुळे जमिनीवर पडली. वादळामुळे घराची बाल्कनी उडाल्याचं दिसतंय.

सुपर टायफून यागी

चीनमधील वादळाचा हा व्हिडिओ हवाफोरम नावाच्या X हॅंडलवरून शेअर करण्यात आलाय. सुपर टायफून यागी ताशी २४० किलोमीटर वेगाने चीनमध्ये दाखल झाले. हेच ते दृश्य आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. या पोस्टला X वर आतापर्यंत 8 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. वादळाने चीनमध्ये कसा हाहाकार उडवला आहे, ते या व्हिडिओमध्ये दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT