Lezim On Bhim Song Saam TV
व्हायरल न्यूज

Lezim On Bhim Song: भिमरायांच्या गाण्यावर विद्यार्थिनींचा लेझिम खेळ; शाळेतला सुंदर VIDEO व्हायरल

School Program: गाण्याच्या चालीवर विद्यार्थिनी लेझिम खेळतायत. होती गरिबी ती घरी, मन लावून शिकला तरी, नाही चुकला शाळेत जाया भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया असे या गाण्याचे बोल आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Lezim In School Program:

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शालेय जीवनात बरेच कष्ट सोसले. वर्गाबाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलं. अडचणींचा डोंगर उभा असूनही त्यांनी एकही दिवस आपली शाळा बुडवली नाही. आज सर्वच जाती धर्मातील लोक त्यांच्यामुळे समानतेचे जीवन जगत आहेत. अशात सोशल मीडियावर एका शाळेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओमध्ये एका शालेय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग शाळेच्या मैदानात जमलेत. येथे काही मुली लेझिम खेळत आहेत. लेझिम सुरू असताना शाळेत बाबा साहेबांचं एक गाणं लावण्यात आलंय. त्याच गाण्याच्या चालीवर विद्यार्थिनी लेझिम खेळतायत. "होती गरिबी ती घरी, मन लावून शिकला तरी, नाही चुकला शाळेत जाया... भारताचा घटनाकार, झाला माझा भिमराया" असे या गाण्याचे बोल आहेत.

विद्यार्थ्यांच्या लेझिमचा हा व्हिडिओ @bhim_universe या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी यावर जयभीम असं म्हटलंय.

आजकाल अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा आणि शिक्षणाचा फार कंटाळा येतो. बाहेर मस्त फिरावं, बंधिस्त रहावं असं त्यांना वाटतं. अनेक जण शिक्षण घेण्याच्या वयात शिक्षण घेत नाहीत. त्यामुळे शेवटी मोठं झाल्यावर त्यांना निकृष्ट दर्जाची किंवा साधी कामे करावी लागतात.

आजकालच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालक त्यांना शाळेसह अन्य अॅक्टीवीटीसाठी देखील क्लास लावतात. ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्याची सुविधा देखील आता आहे. मात्र त्याकाळी असे काही नव्हते. तरीही बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि भारत देशाची घटना लिहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आंदोरा गावात पार पडला बळीराजा महोत्सव

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT