Tour Guide English Speaking Funny Video Instagram
व्हायरल न्यूज

Tour Guide English Speaking Funny Video: इतका कॉन्फिडन्स येतो कुठून ?, ‘टूर गाईड’चं तोडकं मोडकं इंग्लिश ऐकून तुम्हीही लोटपोट हसाल...

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा अफलातून इंग्रजी बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Tour Guide English Speaking Funny Viral Video

अनेकांना इंग्रजी भाषा बोलायला सांगितलं की, त्यांची चांगलीच भंबेरी उडते. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वत:चा टिकाव लागावा यासाठी आपण अनेकदा तोडकं मोडकं तरी का होईना इंग्रजी भाषा बोलतो. बऱ्याचदा देसी स्वॅग करीत देशामध्ये इंग्लिश भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकांना जमतं तर काहींना जमत नाही.

सोशल मीडियावर अनेकदा अशा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा अफलातून इंग्रजी बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने इंग्लिशची वाट लावलेली पाहून नक्कीच लोटपोट हसाल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो तोडकं मोडकं इंग्लिश बोलताना दिसतोय. त्याचा हा कॉन्फिडन्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.

जरीही तो चुकीचा इंग्लिश बोलत असला तरी, त्याचा कॉन्फिडन्स फुल्ल टू फ्लूएंट इंग्लिशसारखा वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून इतका कॉन्फिडन्स येतो कुठून ?, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या व्हिडीओमध्ये तो सोशल मीडिया युजर्सला ‘टूर गाईड’च्या भूमिकेत येऊन एखाद्या स्थळाबद्दल माहिती देताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये ती व्यक्ती, एका डोंगराच्या बाजूला असलेल्या नदीजवळ उभा राहत तिथल्या सौंदर्याचं वर्णन करतोय. ‘टूर गाईड’ च्या भूमिकेत असलेलीही व्यक्ती फुल्ल टू फ्लुएंट इंग्लिश बोलते. पण जरीही तो इंग्लिश बोलत असला तरी, त्याच्या तोडकं मोडकं इंग्लिशने सर्वांनाच लोटपोट हसवलंय. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती पर्यटकांना तिथलं सौंदर्य पाहायला बोलवतेय. सध्या ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या ‘टूर गाईड’चा हा मजेशीर व्हिडीओ @syapa_ielts_da या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

Ameesha Patel : अमिषा पटेल अडचणीत; आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Solapur Tourism : मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेला सोलापूरमधील महत्त्वाचा किल्ला, 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये; आताच करा गुंतवणूक

SCROLL FOR NEXT