आजकाल सोशल मीडियावर जगभरातील विविध आणि विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन. कुठे काही अनोखं किंवा अजब घडलं की लोक लगेच त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. असे व्हिडिओ मग इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होतात. सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही अशा असंख्य व्हिडिओंमध्ये अजब, मजेदार, आणि थक्क करणारे क्षण पाहिले असतील. सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काय चालले आहे, हे समजणे कठीण आहे. नागिनची धून वाजत असताना काही लोक नाचत आहेत, पण त्यांचा डान्स इतका विचित्र आहे की पाहणाऱ्यांनाही गोंधळ वाटावा. काही जण जमिनीवर पडलेले आहेत, तर काहीजण कान बंद करून बसले आहेत, जणू त्यांना तीव्र वेदना होत आहेत. त्यातील एक व्यक्ती तर सतत कोणाच्या तरी पायाजवळ जाऊन पडत आहे. संपूर्ण व्हिडिओभर त्या व्यक्तीचा विचित्र नृत्यप्रकार सुरूच आहे, आणि आसपासचे लोक त्याला पाहून हसत आहेत. हा अजब डान्स आणि त्यावरची लोकांची प्रतिक्रिया पाहून नेटिझन्सही खूपच मनोरंजन घेत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ '@desimojito' या ट्विटर प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हे पाहिल्यानंतर, एलियन्सनी येथे येण्यास नकार दिला.' या व्हिडिओला ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, "ही देखील एक वेगळीच मजा असेल." दुसऱ्या युजरने म्हटले, "इथे सगळे वेडे झाले आहेत." तिसरा युजर विचारतो, "हा अजगर कुठून आला?" चौथ्याने लिहिले, "मी हसावे की टाळ्या वाजवाव्यात?" एका युजरने गंभीरपणे लिहिले, "त्याला एपिलेप्सी आहे, तो माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, प्रिस्क्रिप्शन सुरू आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.