Waterfall Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Waterfall Viral Video: हे फक्त एक आईच करू शकते! मृत्यू आ वासून उभा होता, जिवाची बाजी लावून तिनं आपल्या २ मुलांना वाचवलं, थरारक VIDEO

Mother Save Her Children In Waterfall:काही ठिकाणी मोठ मोठा धबधबा अथवा झऱ्यावरुन पाय घसरून पडण्याची शक्यता असते.

Ruchika Jadhav

Small Children Stuck On The Waterfall: सध्या सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे नदी,नाले ओसंडून वाहू लागलेत. तसेच सर्व धबधबे आणि झऱ्यांमध्ये देखील खळखळ वाहणारे पाणी दिसत आहे.(Latest Marathi News)

धबधबा (Waterfall) किंवा झऱ्यासारख्या ठिकाणी पोहायला गेल्यावर नागरिक मनसोक्त पावसाचा आणि भीजण्याचा आनंद लुटतात. सुट्टीच्या दिवशी अशा अनेक धबधब्यांवर मोठी गर्दी जमा होते. अशात पाण्याच्या ठिकाणी प्रवाह वाढल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी मोठमोठा धबधबा अथवा झऱ्यावरुन पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपली स्वत:ची काळजी घेणे गरजेचं आहे.

अशात सध्या सोशल मीडियावर एका झऱ्यावरील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत काही की दोन लहान मुलं खेळता खेळता झऱ्याच्या टोकावर पोहचली आहेत. खाली खोल दरी आणि फेसाळणारा धबधबा वाहत आहे. जराजरी पाय घसरला असता तर ही दोन्ही मुलं थेट खाली पडली असती. यात त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती.

मुलांसमोर मृत्यू आ वासून उभा होता. आईने हे दृश्य पाहताच तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. मात्र आईने मोठ्या जिद्दीने आपल्या दोन्ही मुलांचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरार एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. २ दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. व्हिडिओ पोस्ट करताच आतापर्यंत त्यावर ७ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकांनी व्हिडिओपाहून आईच्या कामगिरीचं कौतूक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT