Rohit Pawar Viral Post: माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता...; पोटच्या मुलांच्या 'त्या' प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार झाले भावुक, पोस्ट Viral

NCP Crisis: काहीतरी मोठं घडणार आहे याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार आपल्या ८ आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Rohit Pawar Viral Post
Rohit Pawar Viral PostSaam TV
Published On

Maharashtra Political Crisis: राज्यात सध्या पवार विरुद्ध पवार असा वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे. २ जुलै रोजी अजित पवार आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या सकाळपासून बैठका सुरु होत्या. काहीतरी मोठं घडणार आहे याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार आपल्या ८ आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अशात या सर्व घटनेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. (Rohit Pawar Post)

सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ४-५ दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून ते घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केलाय.

Rohit Pawar Viral Post
Political News : चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलताना तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे कपडे फाडू, प्रसाद लाड यांचा अरविंद सावंतांना इशारा

काय म्हणाले रोहित पवार?

नेहमीप्रमाणे आज सकाळी घरी गेल्या गेल्या मुलं धावतच जवळ आली. मला घट्ट पकडलं. मलाही त्यांच्या त्या स्पर्शाचं समाधान नेहमीपेक्षा अधिकच वाटलं. त्यांना जवळ घेऊन बोलत असताना मुलाने प्रश्न केला. डॅडा ५ दिवस झालेय कित्ती वाट पाहतोय तुझी. कुठं गेला होता? (ते दोघंही मला कधी अरेतुरे तर कधी अहोजाहो बोलतात. त्यांच्यासोबतची जवळीक अधिक वाढावी आणि नातं अधिक घट्ट रहावं, म्हणून मलाही तसंच आवडतं.)

मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, बाहेर होतो बाळा. अडचण होती जरा. त्यावर मुलांनी रोहित पवारांना विचारलं ‘‘काय अडचण झाली डॅडा?’’

मी - ‘‘आपल्या संघटनेत जरा अडचण आली होती.”

तो - ‘‘काय अडचण आली होती?’’

निरागसपणे एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारणं त्याचं चालूच होतं. आता या लहान पोराला सांगावं तरी काय, असा प्रश्न पडला होता. दुसरं काहीतरी बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करत होतो. कारण घरी येताना राजकारण घरात घेऊन यायचं नाही आणि बाहेर राजकारण करत असतानामध्ये घर आणायचं नाही. हा माझा मूळ स्वभाव. पण आजचा प्रसंग मात्र माझ्यासाठी अत्यंत वेगळा होता, असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar Viral Post
Maharashtra Political News: सर्वात मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? पडद्यामागे काय घडतंय?

पुढे रोहित पवारांनी (Rohit Pawar) लिहिलं की, मी त्याला म्हणालो, ‘‘अरे बाळा काही नाही, ज्या पक्ष संघटनेत मी काम करतो ना ती संघटना आज अडचणीत आहे. त्यातच संघटना आणि आपल्या कुटुंबात अंतर पडतं की काय असं वाटतंय. काही आपल्याच जवळची माणसं....माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मी गप्प झालो. तेवढयात तो म्हणाला, बोल ना डॅडा!,असा प्रसंग रोहित पवारांनी सांगितला.

पुढे ते म्हणाले की, त्याच्या बोलण्याने पुन्हा भानावर येत कसंतरी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलत असताना मनावर अत्यंत तणाव होता. बोलताना शब्द जड होत होते. नेहमीसारखी सहजता नव्हती. संघटनेतील ज्या गोष्टीमुळं ५-६ दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ होतो, ती गोष्ट काही क्षणापुरती विसरुन मुलांना बोलावं, त्यांनी कसा अभ्यास केला? काय ॲक्टिीव्हिटी केली? हे विचारावं असं वाटंत होतं. पण जणू काय मूळ विषय माझी पाठ सोडतच नव्हता.

मुलाच्या या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो. या चिमुकल्या वयात त्याला काय आणि कसं उत्तर द्यावं, असा गोंधळ माझ्या मनात सुरु होता. तेवढ्यात मुलीने प्रश्न विचारायला सुरवात केली. ती म्हणाली मग आता काय होईल डॅडा? तू कॉफी घेतली का? असे एका दमात तीने दोन प्रश्न विचारले. काही नाही बेटा सगळं ठीक होईल. आपलं कुटुंब जपणं, सर्वांनी गुण्यागोविंदाने, सामंजस्याने, आनंदाने एकत्र राहणं ही आपली संस्कृती आहे. पण त्याबरोबर आपले विचार जपणं हेही तेवढंच गरजेचं असतं आणि हे विचार जपणारी माणसं आहेत आपल्या सोबत, असं रोहित पवार आपल्या चिमुकलीला म्हटले.

पुढे पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, तिला माझं हे बोलणं कितपत कळलं की नाही माहीत नाही. पण तिने होकारार्थी मान हलवली आणि माझा हात स्वतःच्या चिमुकल्या हातात घेतला आणि दुसरा हात माझ्या तोंडावरुन फिरवत म्हणाली, ‘‘नो टेंशन डॅडा.. काळजी करु नको. मॉम, आजोबा, आजी हे आम्ही पण सगळेजण आहोत ना सोबत.’’

तिचे हे शब्द कानावर पडताच मनात विचार आला. ज्यांना आपण लहान आहेत असं म्हणतो, पण ते खरंच किती मोठे असतात ना... अडचणीच्या काळात जवळची माणसं जेव्हा आधार बनतात तो आधार खरंच डोंगराएवढा मोठा असतो. शेवटी कर्तव्याची जाणीव असलेला बाप म्हणून त्या दोघांनाही थोडा वेळ मॉलमध्ये घेऊन गेलो. पण यानिमित्ताने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ मात्र त्यांच्यापेक्षा मलाच खूप काही देऊन गेला, अशी भावुक पोस्ट रोहित पवारांनी लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com