Viral message claiming ₹16,000 for SIR form exposed as fake; citizens urged to stay alert against cyber fraud. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: SIR चा फॉर्म भरल्यावर खरंच 16000 रुपये मिळणार?

SIR Form Scam Alert: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... आता SIRचा फॉर्म भरल्यावर 16 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच 16 हजार रुपये मिळणार आहेत का...? या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

SIR चा फॉर्म भरल्यानंतर 16 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...या मेसेजमुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर काहींच्या मनात या मेसेजबाबत संभ्रमही निर्माण झालाय...पण, खरंच SIR पूर्ण झाल्यानंतर एवढे पैसे मिळणार आहेत का...? पैसे मिळणार असतील तर ते कसे मिळणार...? असे सवाल उपस्थित होत आहेत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

SIR ही निवडणूक आयोगाची एक मोहीम आहे, ज्याद्वारे मतदार याद्यांची छाननी केली जाते...मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त वेळा आलेली नावे वगळली जातात...मतदार यादी पूर्णपणे अचूक बनवणे हा यामागचा उद्देश असतो...या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे BLO घरोघरी जाऊन पडताळणी करतात...पण, काहींना मेसेज, आणि लिंकही पाठवली जातेय...SIR केलं तर 16 हजार मिळणार असा दावा केल्यामुळे अनेकजण ती लिंक उघडून पाहत आहेत...पण, कुणाला पैसे मिळाल्याचं आढळलं नाही...त्यामुळे आम्ही याची अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

SIR अर्ज भरल्यास 16 हजार मिळणार हा दावा खोटा

SIR ही निवडणूक आयोगाची मतदार यादी पडताळणी

SIRचा कोणत्याही आर्थिक लाभाशी संबंध नाही

लिंक पाठवून सायबरचोर बँक खाती रिकामी करतायत

SIR सांगून कुणी काही पाठवल्यास आधी शहानिशा करा

आणि नंतर डाऊनलोड करा...तरीदेखील आपण काय काळजी घ्यायला हवी पाहुयात...

काय काळजी घ्यावी?

1 बीएलओ घरी भेटी देतात

2 अर्जावर बीएलओचा मोबाईल नंबर असतो

3 SIR संबंधात कुणाचा फोन आल्यास भेट घ्या

4 अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक उघडू नका

5 आयोगाच्या 1950 क्रमांकावर संपर्क साधा

एवढी जरी तुम्ही काळजी घेतली तरी फसवणूक टाळता येईल...अशी कोणतीही सरकारची योजना नसून, SIR केल्यावर 16 हजार मिळणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यांच्या तक्रारी दाबण्याचं नवं रॅकेट, बियाणं कंपन्या, कृषी केंद्र आणि अधिकाऱ्यांचं साटलोटं

संघ दक्ष, GEN Z लक्ष्य! भागवत म्हणतात, चुकलं म्हणूनच GEN Zचं आंदोलन

महिलेचा एकाच वेळी 4 बाळांना जन्म, घरातच झाली प्रसुती, डॉक्टरही चक्रावले

देशातील नामांकित आयटी हब खड्ड्यात, पुण्यातील हिंजवडी IT पार्कला खड्ड्यांचा सापळा

क्या बोलती पब्लिक? CJP ची देशवासियांना नवी साद, जंतरमंतरनंतर सीजेपीची जनसंवाद मोहीम

SCROLL FOR NEXT