Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Viral Video : अरेरे! घाई महिलेला नडली; फेरीबोटीतून उतरताना वाचला थोडक्यात जीव; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video : दापोलीमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात एका फेरीबोटमधून उतरताना महिलेचा जीव थोडक्यात बचावला गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरदिवशी सोशल मीडियावर देशभरापासून ते जगभरातील कानाकोपऱ्यातील घटना व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. याच व्हिडिओत कधी थरारक अपघात असतील तर कधी गंमतीदार किस्से असतील आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात एका फेरीबोटीतून उतरण्याची घाई महिलेला महागात पडलेली आहे.नक्की काय झाले असेल ते तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दापोलीमधील(Dapoli) असल्याचे समजते. या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नदीकिनारी एक फेरबोट येताना दिसत आहे. या फेरीबोटीत अनेक प्रवाशी आहेत मात्र जशी फेरीबोट नदीकिनारी येताना दिसत आहे त्यात अनेक प्रवाशी फेरीबोटीच्या दिशेने उतरण्याच्या तयारी असतात. मात्र एक महिला आहे जी फेरीबोट संपूर्ण नदीकिनारी पोहचे पर्यंत नाही तो पर्यंत उतरते मात्र घाई केल्याने ती महिला जोरात जमिनीवर कोसळते आणि फेरीबोट तिच्या अंगावर चढते. तात्काळ नदीकिनारी असलेले अनेक प्रवाशी तिच्या मदतीसाठी धावून जातात.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@saamtv'या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ(Video) पोस्ट होताच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'दापोलीत फेरीबोटीतून उतरण्याची घाई महिलेला नडली'.व्हिडिओ पाहून अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील अनेक यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,' बरा झाला मस्ती जिरली',तर अनेकांनी'काळजी घ्यावी' अशाही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर

Neet Paper: मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये 'GOD' नाव असलेला नंबर; CBI नं अखेर उलगडला नावाचा सस्पेन्स

PM Internship Scheme 2026 : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी! दरमहा मिळतील ९००० रुपये, कसे? जाणून घ्या

२९ खासदार असलेला पक्ष फुटणार? १८ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? चर्चांना उधाण

महागडे प्रॉडक्ट्स नाहीत! 'हे' आहे माधुरी दीक्षितच्या चिरतरूण सौंदर्याचं खरं रहस्य

SCROLL FOR NEXT