Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेमात धोका, मंडपात जाऊन ठोकला; प्रेयसीने वऱ्हाडी मंडळीसमोरच नवरदेवाला चोपला, नवरी पाहताच राहिली, पाहा व्हिडीओ

Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडिओत नक्की काय घडले ते पाहून प्रत्येजण अवाक् झालेले आहे.एकदा व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Wedding Drama Video: गेल्या काही दिवसात अनेक लग्नसराईची धामधुम आपल्याला प्रत्येक शहरात पाहण्यासाठी मिळत आहे.लग्नकार्यात अनेक गमतीजमती होत असतात,मात्र सध्या अशाच एका लग्न कार्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे,ज्यात लग्नाचे विधी सुरु असताना अचानक एक तरुणी येते आणि नवरदेवाला जोरदार मारण्यास सुरुवात करते.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नसराईची जोरदार तयारी दिसत असून अनेक पाहुणे मंडळी मंडपात आहेत.दरम्यान नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालते,त्यानंतर नवरेदवही नवरीच्या गळ्यात हार घालणार असतो,मात्र त्याच दरम्यान एक तरुणी रागाच्या भरात तिथे येते आणि नवरदेवाला जोरदार लाथ मारते त्यामुळे नवरदेव चक्क जमिनीवर आपटला जातो.तरीही ती तरुणी त्या नवरदेवाला मारण्याचे थांबत नाही,त्यातच तिथे एक महिला येते आणि तरुणीला थांबवते.सर्व घटना लग्नातील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

लग्नकार्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या 'hasa_hasat_raha'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळालेले आहेत.

तरुणीची मंडपात जबरदस्त एन्ट्री पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्हिडिओवर दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''लग्नाच्या आधी प्लास्टिक सर्जरी करायची ना भाऊ''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''हे असच असत खर्याची...दुनिया..नाही.खर प्रेम करणाऱ्या ला कोणी भेटत नाही'' तर अजून एकाने कमेंट केली,''आमच्या गावातील घटना आहे ही नवरदेव ची पहिली प्रेयसी होती'',अशा अनेक कमेंट आलेल्या आहेत.

टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT