Indore Shocking News: गेल्या काही दिवसांपासून हार्ट अटॅकची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. चालता बोलता, डान्स करताना, खुर्चीवर बसलेले असताना अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. यातच आता मध्य प्रदेशमधील एका घटनेची भर पडली आहे.
मध्य प्रदेशमदील इंदौर येथे एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, कामावर गेला होता, दरवाजा उघडत होता, त्याचवेळी हार्ट अटॅक आला अन् भयानक मृत्यू झाला. या भयंकर प्रकाराचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंदोरमधील फॅक्ट्रीमध्ये १८ वर्षे काम करणाऱ्या मजूराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. कंपनीचे दार उघडत असतानाच अचानक हार्ट अटॅक आला अन् जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रूग्णालयात नेहण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्रतामिक तपासातानू हार्ट अटॅक असल्याचे समोर आलेय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय.
व्हायरल(Viral) होत असलेला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील dainik_agniban या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच कॅप्शनमध्ये,''इंदूरमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे'' असे लिहिण्यात आलेले आहे. ही घटना पाहिल्यानंतर नागरिकांनी अनेक हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्य आहेत.
टीप: व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. मात्र, याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.