Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अचानक कारच्या समोर आला बिबट्या, प्रवासी घाबरले, VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम

Leopard Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.सध्याही असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात वरंधा घाटात बिबट्या दिसलेला आहे.

Tanvi Pol

Leopards In Warandh Ghat: भोर-महाड मार्गावारील असलेल्या वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार प्रवाशांना दिसून आला.सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.वारंवार बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत सोमवारी (ता.२७) रात्री आठ वाजता बिबट्याचा(leopard) मुक्त संचार प्रवाशांना दिसून आला.अंकुश गंगाराम धामुनसे रा.हिर्डोशी (ता.भोर) आणि संतोष साबळे (पुणे) हे बिरवाडी (ता.महाड) येथे कामानिमित्त गेले होते. ते काम उरकून पुन्हा गावाकडे येत असताना घाटमाथ्यावरील द्वारमंडपहून पुढे आल्यावर शिरगाव हद्दीत त्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूला बिबट्या दिसला. म्हणून त्यांनी गाडी थांबवून थोडी मागे घेतली.

तेवढ्यात तो बिबट्या रस्ता ओलांडून डाव्या बाजूच्या डोंगराकडे निघून गेला. रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ धामुनसे यांनी आपल्या मोबाईलमध्ये काढला आहे. बिबट्या ज्या दिशेने आला त्या बाजूला नीरा नदीचे उगमस्थान असलेले पाण्याचे कुंड आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठी बिबट्या कुंडावर गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भोर महाड मार्गावरुन दुचाकीसह वाहनांची रात्रदिवस वर्दळ असते. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. हिरडस मावळात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले (Attacks)वाढले असतानाच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT