Pune News Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune News: पुणे विमानतळाच्या जवळ कॅब चालकाला मारहाण; नेमकं काय घडलं? पाहा

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या पुणे शहरातील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका कॅब चालकास मारहाण करण्यात आलेली आहे. मात्र घडलेल्या घटनेत नेमके काय घडले असेल ते पाहा.

Tanvi Pol

Pune News: गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरातून अनेक गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. कधी भररस्त्यात हत्या तर कधी काही. सर्व घडलेल्या घटनांचे व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पुणे विमानतळाच्याजवळ एका कॅब चालकास मारहाण करण्यात आलेली आहे.

प्रकरण नेमके काय?

पुणे (Pune)विमानतळाच्या जवळ असलेल्या एरो मॉल येथे कॅब चालकाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेत नोंदणी नसलेल्या कॅब कंपनीच्या एका चालकाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. एका कॅब चकलाच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय गिग कामगार मंचाच्या कॅब (Cab)चालकांनी काम बंद आंदोलन केलं. घडलेली घटना बुधवार रात्री असल्याचे समजत आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मारहाण केलेल्या संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ ''SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' पुणे विमानतळाच्याजवळअसलेल्या एरो मॉल येथे कॅब चालकाला मारहाण ''असे लिहिण्यात आलेले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रश्न उपस्थित झाले असून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''दिवसेंदिवस काय सुरु आहे'',तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे''तर अनेकांनी प्रश्न विचारत या व्हिडिओला प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT