Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर दिसला बिबट्या, नागरिक भयभीत; VIDEO

Pune Airport Video: सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण घाबरुन गेला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पुणे विमानतळावरील आहे. जिथे चक्क प्रवाशांना बिबट्याचे दर्शन घेडले आहे.

Tanvi Pol

Leopard on runway: पुणे शहराच्या विमानतळावर एक अनपेक्षित प्रकार घडला असून, धावपट्टीवर अचानक बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या धावपट्टी बसलेला असताना काही प्रवाशांच्या नजरेस पडला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रन-वे वर बिबट्याची एन्ट्री – नेमकं काय घडलं?

दिनांक २८ एप्रिलच्या रात्री अंदाजे ९.३० वाजता पुण्यातील लोहेगाव परिसरात, पुणे विमानतळाजवळ बिबट्या(leopard Video) फिरताना नागरिकांनी पाहिला. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो काही लोकांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

विमानतळ (Airport Video) परिसरात गरज नसल्यास फिरू नये, असे आवाहन करण्यात आलं होतं. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा पुणे विमानतळाच्या धाव पट्टीवर सुद्धा वावर होता. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड केला गेला आहे आणि त्यानंतर फेसबूक, ट्वीटर अशा माध्यमांवर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध लोकांनी या घटनेला एक संतापजनक म्हटलं आहे तर काहींनी विविध मतं दिली आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं,''जंगल उध्वस्त करून त्या जागी आयटी पार्क विमानतळ बनवल्यावर हे जंगली प्राणी जाणार तरी कुठं?'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''बिबट्या बरोबर त्याच्या जागावर आलाय पण विमानतळ चुकीच्या जागेवर आलय'' तर काहींनी,''सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थितीत केला आहे'' अशा संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT