Wedding Fight Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Wedding Fight: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केली भलतीच मागणी; सासऱ्याने भर मंडपात चप्पलेने धुतला, VIDEO व्हायरल

Wedding Fight Viral Video: एका नवरदेवाला लग्नाअगोदर मोटारसायकल पाहिजे, असा हट्ट करणे चांगलेच महागात पडले आहे.

Satish Daud

Wedding Fight Viral Video: संपूर्ण देशात हुंडाबंदीचे कठोर नियम असतानाही अनेकदा हुंड्यामुळे अजूनही अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. अलीकडेच असाच एक प्रकार समोर आला. पण, यात हुंडा मागितलेल्याचीच दया यावी अशी अवस्था करण्यात आली आहे.

देशात हुंडाबंदी कायदा असतानाही आजमित्तीस नवरा मुलगा किंवा त्याचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून, पैसे, सोनं-नाणं किंवा गाड्यांची अपेक्षा करतात. त्यानुसार, मुलीच्या पित्याकडूनही अनेकदा हा लाड पुरवण्यात येतो.  (Latest Marathi News)

मात्र, एका नवरदेवाला लग्नाअगोदर मोटारसायकल पाहिजे, असा हट्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. अट्टहास करणाऱ्या नवरदेवाची सासऱ्याने भर मंडपातच चप्पलेने धुलाई केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. (Breaking Marathi News)

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) एक वयोवृद्ध व्यक्ती नवरदेवाला चप्पलेने मारहाण करत आहेत. भर मंडपातच त्याने नवरदेवाची चांगलीच धुलाई केली आहे. पूर्व आईपीएस अधिकारी (@ipsvijrk) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

नवरदेवाने सातफेरे घेण्याआधी मोटारसायकल पाहिजे असा हट्ट केला होता. हा हट्ट त्याच्या चांगलाच अंगलट आला. जावयाने अचानक मोटारसायकल मागितल्याने सासरा भडकला. त्याने पायातील चप्पलेने त्याची चांगलीच धुलाई केली. काही जण याला वास्तव म्हणत आहेत, तर काही स्क्रिप्टेड आहेत.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? हे कळू शकलं नाही. मात्र, व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला होता. एका नवरदेवाने लग्नाआधी बोलेरो गाडीची मागणी केल्यानंतर वधूकडील मंडळींनी त्याला चांगलाच धुतला होता.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वधूकडील मंडळी इतके संतप्त झाले होते की, त्यांनी नवरदेवाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती. पोलिसांनी (Police) मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

SCROLL FOR NEXT