Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दे दणादण! तरूणाने २ तरूणींचे केस धरले अन् गरागरा फिरवले, भररस्त्यात जोरदार राडा

Fighting Viral Video: सोशल मीडियावर जगभरातील घटना काही क्षणात लोकांना कळतात. त्यात कधी हसवणारे क्षण असतात तर कधी धक्कादायक असे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

Tanvi Pol

Boy Girl Argument Video: सध्याच्या डिजिटल युगात काही घडलं की ते काही क्षणात कॅमेऱ्यात कैद होतं आणि सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरले जाते. सध्या असंच काहीसं घडलं आहे, जे प्रत्येक नेटकरी वर्गाच्या चर्चेचा विषय ठरत आहे. जिथे भररस्त्यात एका तरुण आणि तरुणीमध्ये झालेला तुफान वाद आणि केस ओढण्याचा प्रकार आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, वाहतुकीची आाणि नागरिकांच्या गर्दीत अचानक एक तरुण आणि काही तरुणी एकमेंकावर आरडाओरड करण्यास सुरुवात करतात. पाहता पाहता हा वाद इतका विकोपाला जातो की, ते थेट मारहाण करुण्यास सुरुवात करतात. धक्कादायक म्हणजे एकटा तरुण दोन तरुणींच्या केसांना धरत तुफान त्यांना मारत आहे. मात्र, इतक्या नागरिकांमधून एकच तरुणी त्या बाकीच्या तरुणींची मदत करण्यासाठी येते.

सुरु असलेल्या हाणामारीचा व्हिडिओ काही लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. अवघ्या काही तासांतच तो सर्व व्हिडिओ हजारोंच्या व्ह्यूजसह व्हायरल झाला. आता हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mimmi_rj या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. अद्याप हा प्रकार नक्की कुठला आहे हे कळू शकलेले नाही आणि या वादाचे कारणही समजले नाही.

सोशल मीडियावर संताप

या व्हिडिओवर(Video) नेटकर्‍यांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एक यूजरने कमेंट केली,''नक्की काय घडलं असेल'' तर काही यूजर्संनी ''तरुणींवर टिका केली आहे'' शिवाय अन्य यूजर्संनी तरुणाच्या अशा कृत्यावर संताप व्यक्त करत नागरिकांवरही संताप व्यक्त केला आहे.

टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT