Real snake caught on camera slithering out of a television screen, shocking the entire household.  Saam Tv
व्हायरल न्यूज

बाप रे! घरात टीव्ही सुरू अन् त्यातून बाहेर आला साप; संपूर्ण कुटुंब हादरलं; VIDEO

Snake Found Inside TV: घरात टीव्ही सुरू असताना त्यातून अचानक जिवंत साप बाहेर आल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना पाहून कुटुंबातील सदस्यांची भंबेरी उडाली. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Snake Viral Video: बाप रे! टीव्हीतून जिवंत साप आला हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, मात्र, ही घटना खरी आहे. परभणीतील एका घरात टीव्ही सुरू असताना अचानक त्याच्या मागील बाजूने एक जिवंत साप बाहेर पडला आणि क्षणात सगळ्या कुटुंबीयांची भंबेरी उडाली.

ही घटना परभणीतील एका परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात घडली. नेहमीप्रमाणे दुपारी घरातील सर्वजण टीव्ही पाहत बसले होते. लहान मुलं कार्टूनमध्ये रंगून गेलेली, तर मोठेही एखाद्या मालिकेत गुंतले होते आणि तेवढ्यात, टीव्हीच्या स्क्रीनवर काहीतरी हालचाल जाणवली. सुरुवातीला वाटलं की टीव्हीत काहीतरी तांत्रिक अडचण असेल, पण काही क्षणांतच त्या टीव्हीच्या स्क्रीनवर साधारण एक लहानसा साप (Snake) सरपटत असल्याचे दिसले.

त्यानंतर सगळ्यांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली. घरातील लहान मुलं रडू लागली, तर मोठे लगेच घराच्या बाहेर धावले. सुदैवाने साप कुणालाही चावला नाही. लगेचच सर्पमित्रांना फोन करून बोलावण्यात आलं. साधारण अर्ध्या तासात सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडून दिलं.

कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा व्हिडिओ(Video) मोबाइलमध्ये शूट केला होता. सापाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''देवा आता लोक घरात पण सुरक्षित नाहीत'' तर अजून एका यूजरने म्हटलं,''त्याला सुद्धा टीव्ही पाहायचा होता'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT