Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Petrol Pump Fight Video: गोरखपूरमध्ये पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार घडला आहे. हेल्मेट न घालता आलेल्या महिलेने कर्मचारी महिलेला मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमध्ये पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेला मारहाण केली आहे. महिलेने 'नो हेल्मेट नो पेट्रोल' मोहिमेचे उल्लघंन केले आहे. महिला ही हेल्मेट न घालता पेट्रोल भरण्यासाठी आली असल्याने हा संपूर्ण प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रवास करताना अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. हेल्मेट न घालता प्रवास करतात यामुळे अपघाताच्या घटना घडतात. यासाठी पोलिसांनी 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे. विविध माध्यमातून वाहनधारकांचे हेल्मेटबाबत प्रबोधन करण्यात येत. अशातच नुकताच पेट्रोल पंपावर हेल्मेट न घातल्यामुळे महिलांमध्ये मोठा राडा झाला आहे.

लखनऊच्या गोरखपूर रामगढताल पोलिस स्टेशन परिसरातील पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर हेल्मेट न घालता आलेल्या महिलेला पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला आहे. यावरून महिलेला राग आला आहे. संतापलेल्या महिलेने कर्मचारी महिलेला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपावर 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' चे बॅनर लावले आहे. दरम्यान एक महिला हेल्मेटशिवाय पेट्रोल पंपावर आली तेव्हा कर्मचारी महिलेने या बॅनरकडे बोट दाखवत पेट्रोल देण्यास नकार दिला आहे. दरम्यान महिला संतापली. महिलेने बाचाबाची करण्यास सुरूवात केली आहे. महिला म्हणाली की, येथूनच पेट्रोल घेऊन दाखवीन. महिलेने स्कूटी बाजूला लावली आणि पुन्हा पेट्रोल घेण्यास आली.

दरम्यान कर्मचारी महिलेशी हुज्जत घातली. कर्मचारी महिलेने तिला रांगेमध्ये यायला सांगितले असता महिलेने चप्पल फेकून मारली आहे. पेट्रोल पंपावर या दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. कर्मचारी महिलेला जमिनीवर पाडलं आहे आणि महिलेने तेथून पळ काढला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस मारहाण करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा शरद पवारांना फोन; प्रकृतीची केली विचारपूस

Vasai Panvel Local: पनवेल ते वसई लोकल सुरू होणार, 17 स्थानकांचा असणार रेल्वे मार्ग; 12 हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे

Ramayana Movie Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! पहिल्याच दिवशी छफरफाड कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या! पत्नीसह सासरच्यांना संपवून मृतदेह विविध ठिकाणी फेकले; हादरवणारी घटना

SCROLL FOR NEXT