Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

Nashik Viral Video: नाशिकच्या श्रमिकनगरात कुत्र्यावर अमानुष अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कुत्रा भुंकला म्हणून त्याला मोटारसायकलला बांधून फरफटत नेण्यात आले. या मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू झाला असून, परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Manasvi Choudhary

मुक्या प्राण्यांवर अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये कधी प्राण्यांवरचं प्रेम दिसते तर कधी धक्कादायक असतात. जे पाहून काळजाचे ठोका चुकतो. अशातच नाशिकमधून एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कुत्रा भुंकला म्हणून त्याला कडक शिक्षा दिली आहे. जे पाहून तुम्हीही म्हणाल, माणुसकी मेली की काय?

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुत्रा जिवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. एका क्रूर व्यक्तीने कुत्रा भुंकतो म्हणून त्याच्या पायाला दोरीने बांधून मोटारसायकलला बांधलं आहे. एवढचं केलं नाही तर, त्याला पुढे फरफटत देखील नेलं आहे. अत्यंत संतापजनक प्रकार घटना आहे. या मारहाणीत कुत्र्‍याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात ही घटना घडली आहे. रस्त्यावर कुत्रा भुंकत असल्याने एका व्यक्तीला राग आला आहे. संतापलेल्या या व्यक्तीने कुत्राला मारलं असून त्याचे पाय मोटारसायकलला बांधून संपूर्ण रस्त्यावर फरफटत नेलं आहे. या मारहाणीत कुत्र्‍याचा जीव गेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींनी सातपूर पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT