जम्मूमध्ये थार गाडी चालकाने जाणूनबुजून वृद्ध व्यक्तीला धडक दिली.
व्हिडिओमध्ये आरोपीने गाडी वळवून पुन्हा धडक दिल्याचं स्पष्ट दिसतं.
ही धक्कादायक घटना व्हायरल झाली असून जनतेत संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोपीवर त्वरित आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
काही वाहन चालक रस्त्यावर बेभानपणे कार चालवतात. वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत भरधाव वाहने चालवतात. अशाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात थार चालक बेभानपणे कार चालवत एका वृद्धाच्या अंगावर कार चढवतो. ही घटना जम्मूमधील असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जम्मूमधील पॉश भाग असलेल्या गांधीनगरमध्ये एका थार स्वाराने स्कूटरवरून जाणाऱ्या एका वृद्धाला धडक दिली. धडकेमुळे स्कूटरवाला खाली पडतो. त्यानंतर तो उभा राहतो. हे पाहून थार चालक आपली कार रिव्हर्स आणत पुन्हा त्या वृद्धाच्या अंगावर कार चढवतो. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी थार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आपण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकतो की,शहरातील एका भागातील रस्त्यावर वाहने धावत आहेत. त्या रस्त्याच्या एका बाजूकडून स्कूटी चालक येतो. दुसऱ्या बाजून थार चालक येताना दिसतोय. कारचा स्पीड वाढव थार चालक वृद्धाला धडक देतो. त्या धडकेनं वृद्ध स्कूटी चालक रस्त्यावर पडतो. नंतर वृद्ध व्यक्ती स्वत: ला सांभळते. वृद्ध माणूस पुन्हा रस्त्यावर उभा पाहतो. थार कार चालक काही अंतरावर पुढे जातो. तेव्हा तो वृद्ध माणूस उभा राहिल्याचे पाहतो. मग परत थार कार चालक गाडी उलटली मागे आणत पुन्हा वृद्धाला धडक देतो. यावेळी वृद्ध व्यक्ती रस्त्यावर पाठीवर पडतो.
त्यानंतर थार कारमध्ये बसलेला दुसरा व्यक्ती काली उतरतो आणि त्या वृद्धाला काहीतरी बोलतो. तोपर्यंत तेथे इतर वाहन चालक जमा होतात. त्या वृद्धाला शिवीगाळ केल्यानंतर थार चालक आणि त्यांच्यासोबत असलेला व्यक्ती पु्न्हा गाडीत बसतात आणि निघून जातात. थार गाडी तिथून निघाल्यानंतर काही लोकांनी वृद्धाला उचलतात. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी याला गंभीर घटना म्हटलंय.
थार चालकाने जाणूनबुजून एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली. चालकाने गाडी रिव्हर्स घेत पुन्हा वृद्धाला धडक दिली. यानंतर चालकाने वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ केली. त्याला गंभीर धमक्या दिल्या, हे सर्व जाणूनबुजून केल्याची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्थानिक रहिवाशांनी याला गंभीर आणि अमानवी कृत्य म्हटले. तसेच यावर त्वरित कारवाईची मागणी केली. जम्मू पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.