Indigo Video Saam Tv
व्हायरल न्यूज

इंडिगो विमानात गोंधळ! सहप्रवाशाला लगावली कानाखाली; VIDEO

Flight Viral Video: सोशल मीडियावर एक हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही व्हायरल होत असलेली घटना एका विमानातील आहे. तुम्हीही एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Passenger Fighting Video: मुंबईहून कोलकात्याच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगोच्या एका फ्लाईटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. विमानातच एका प्रवाशाने आपल्या सहप्रवाशाला जोरदार कानाखाली मारली. हा प्रकार एवढा गंभीर होता की, लँडिंगनंतर आरोपी प्रवाशाला थेट कोलकाता विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. सोशल मीडियावर सर्व घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

सदर घटना नेमकी केव्हा घडली, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. हे भांडण (Quarrel) विमानाने टेकऑफ करण्याच्या आधी घडले होते. मात्र, इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली होती.

विमानाच्या लँडिंगनंतर इंडिगोने तात्काळ स्थानिक विमानतळ प्रशासनाला या घटनेची माहिती दिली आणि संबंधित प्रवाशाला सुरक्षा पथकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर विमानतळावरच यासंबंधी तपास सुरू करण्यात आला आहे.

इंडिगोने या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "आमच्या फ्लाईटमध्ये दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं. अशा प्रकारचं वर्तन अत्यंत निंदनीय असून, ते कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही. विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता आणि आदर कायम राखणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे."

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT