Birthday Cake Blast Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Birthday Cake Blast Video: वाढदिवसाचा केक फटाक्यांसारखा हातातच फुटला, Video सोशल मीडियावर व्हायरल

वाढदिवस साजरा करताना मुलाच्या हातातच केक फुटला. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या क्षणाला मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहे.

Manasvi Choudhary

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस असतो. वाढदिवसादिवशी केक कापण्याची पद्धत आहे. आजकाल वाढदिवसादिवशी कुटुंब, मित्र परिवारसह स्विमिंग पूलवर वाढदिवस साजरा करण्याचा जबरदस्त ट्रेंड आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसत आहे. आनंदी वातावरणात या मुलाने हातात केक घेतला आहे. केक कापणार तेवढ्यात हातात हा केक फुटतो आहे. मुलाच्या हातात केकचा स्फोट होतो. हा मुलगा पूर्णत: घाबरून जातो. त्याच्या डोळ्यांमध्येही हा केक उडाला आहे.

व्हिडिओमध्ये ज्याक्षणी हा मुलगा केक हातात घरतो तेव्हा एक स्फोट होतो आणि केक सर्वत्र उडतो. हा मुलगा देखील प्रचंड घाबरतो. इकडे तिकडे जातो आणि थेट स्विमिंग पूलमध्येच उडी घेतो. सोशल मीडियावर या धक्कादायक क्षणाचा तेवढाच मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना वाढदिवसादिवशीच या मुलासोबत विनोदमय घडली आहे. हा कोणताही अपघात नाही नसून मित्र त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना हसताना दिसत आहेत. यामुळेच मित्रांनी मजेदार वाढदिवस म्हणून नियोजित आखणी करत हे केलं असल्याचं समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT